काय आहे Madhya Pradesh Bhoj Open University? इथे काय शिकवले जाते?

36
काय आहे Madhya Pradesh Bhoj Open University? इथे काय शिकवले जाते?
काय आहे Madhya Pradesh Bhoj Open University? इथे काय शिकवले जाते?

मध्यप्रदेश इथल्या भोज येथे असलेली ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच MPBOU ही भोपाळमध्ये आहे. ही युनिव्हर्सिटी १९९१ साली स्थापन करण्यात आली होती. या युनिव्हर्सिटी मध्ये प्रामुख्याने ओपन आणि डिस्टन्स लर्निंग मॉडेलद्वारे उच्च शिक्षण दिलं जातं. जे विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांमुळे कॉलेजांमध्ये प्रत्यक्षात हजर राहू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो. (Madhya Pradesh Bhoj Open University)

(हेही वाचा- Thane जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा)

MPBOU इथल्या अभ्यासक्रमांमध्ये अनेक पदव्या, पदव्युत्तर पदव्या, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्राम शिकवले जातात. युनिव्हर्सिटीच्या काही लोकप्रिय अभ्यासक्रमांमध्ये BA, B.Sc, B.Ed आणि MBA यांचा समावेश आहे. या युनिव्हर्सिटीला, ‘युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन’ म्हणजेच UGC द्वारे मान्यता मिळालेली आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या ओपन आणि डिस्टन्स लर्निंग सिस्टीम द्वारे वेगवेगळ्या प्रदेशांना शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. (Madhya Pradesh Bhoj Open University)

या युनिव्हर्सिटीचं नाव प्रसिद्ध राजा भोज यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. राजा भोज यांनी शैक्षणिक मूल्ये रुजवण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. (Madhya Pradesh Bhoj Open University)

‘वेगवेगळ्या वैयक्तिक कारणांमुळे कॉलेजला न जाऊ शकणाऱ्या, पण तरीही शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे’ हे MPBOU चं प्रथम उद्दिष्ट आहे. (Madhya Pradesh Bhoj Open University)

(हेही वाचा- Uday Samant : उद्योगमंत्र्यांना वैमानिकाने दिला नकार; समृद्धी महामार्गावरून केला प्रवास)

◆जे विद्यार्थी कॉलेजांमध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, असे विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात.

◆इथे काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांच्या वेळेनुसार शिक्षण दिलं जातं.

◆नवनवीन शिक्षणपद्धती आणि तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन आणि शिक्षणामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण देण्याची खात्री दिली जाते.

◆MPBOU इथे वेगवेगळ्या विषयांमध्ये विस्तृत अभ्यासक्रम दिले जातात. जसे की,

●अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्स: BA, B.Sc, B.Com, B.Ed, BBA, इत्यादी.

●पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम्स: MA, M.Sc, M.Com, MBA, MCA, इत्यादी.

●डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्राम्स: वेगवेगळे प्रोफेशनल आणि कलात्मक कोर्स इत्यादी.

◆शिकण्याच्या पद्धती

या युनिव्हर्सिटीमध्ये प्रामुख्याने ओपन आणि डिस्टन्स लर्निंग शिक्षण पद्धती वापरण्यात येते. जसे की,

●छापील पुस्तकं विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवली जातात.

●ई-पुस्तकं, ऑनलाइन व्याख्याने आणि डिजिटल लायब्ररी यांचा वापर विद्यार्थ्यांना करता येतो.

●संपर्क वर्गांद्वारे व्यावहारिक आणि परस्परसंवादी शिक्षणासाठी वैयक्तिक सत्रे आयोजित केली जातात.

●टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे आभासी वर्ग आणि चर्चा करण्यात येते.

●विद्यार्थी सहाय्य सेवा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अनुभव वाढवण्यासाठी MPBOU अनेक नव्या गोष्टींचं समर्थन करते.

●विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्नांसाठी मदत करण्यासाठी राज्यभरात अभ्यासकेंद्रे आहेत.

●समुपदेशन सेवेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शैक्षणिक आणि करिअर संबंधित समुपदेशन केलं जातं.

●परीक्षा आयोजित करण्यासाठी सोयीस्कर केंद्रे उपलब्ध करून दिली जातात.

(हेही वाचा- Hassan Nasrallah ठार झाल्यानंतर Jammu & Kashmir मध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; होत आहे आतंकवादाचे समर्थन)

MPBOU ही युनिव्हर्सिटी अनुदान आयोग म्हणजेच UGC द्वारे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी आहे. तसंच ही युनिव्हर्सिटी ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ म्हणजेच AIU ची सदस्यही आहे. या युनिव्हर्सिटीच्या पदव्या रोजगार मिळवण्यासाठी आणि पुढील अभ्यासासाठी वैध आहेत. (Madhya Pradesh Bhoj Open University)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.