७/१२चा उतारा हा शब्द कुठून आला? वाचा संपूर्ण माहिती

जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूच्या प्रमाणपत्रापर्यंत आपल्यापैकी प्रत्येकालाच सरकारी कागदपत्रं ही उपयोगाची असतात. आता सरकारी कामकाज, सरकारी भाषा हे सगळं खूपच किचकट आणि वेळखाऊपणाचे काम आहे, अशी तक्रार आपण नेहमीच करत असतो. पण तरीही यातून कोणाचीही सुटका नाही. अनेक सरकारी शब्द, त्यांचे अर्थ आपल्याला कधीही कळत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे ७/१२ चा उतारा. या एका कागदाला प्लॅटिनमचे मोल आहे. कारण सध्याच्या काळात जमीन विकत घेणे म्हणजे सोन्याची खाण खरेदी करण्यासारखेच आहे. पण हा ७/१२ शब्द नेमका आला कुठून?

७/१२ची सुरुवात कशी झाली?

७/१२चा उतारा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे, हे सांगण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. साधारणपणे भारतामध्ये जमिनीचा व्यवहार करताना सात-बाराचा उतारा आणावा लागतो. आता सात बारा ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी रूजू झाली हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. खरं तर सात बारा हे कुठल्याही कायद्याचे कलम नाही, तर हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिलेले योगदान आहे.

काय आहे ७/१२

अहिल्याबाईंनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात १२ फळझाडे लावली. त्यातील सात झाडे त्या गरीबाची आणि पाच झाडे सरकारची. बारा झाडांची निगा राखून, सात झाडांची म्हणजे ७/१२ची फळे स्वत: खायची आणि राहिलेल्या पाच झाडांची फळे, म्हणजे ५/१२ची फळे सरकार दरबारी जमा करायची, ती इतर गरीबांना वाटण्यासाठी. त्यासाठी एक सरकारी कार्यालय निर्माण करुन या झाडांची नोंद करण्यात आली. या नोंदीच्या उता-याला सात-बाराचा उतारा म्हणण्याचा प्रघात पडला, तो आजतागायत चालू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here