काय आहे पितृपक्षाचे महत्त्व?

111

हिंदू संस्कृतीत पितृपक्षाला महत्व आहे. या वर्षी पितृपक्षाचा कालावधी 20 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. हा साधारणपणे 15 दिवसांचा कालावधी असल्याने याला पितृपंधरवडा असेही संबोधले जाते. याच निमित्ताने पितृपक्ष कसे सुरु झाले असावेत आणि त्यामागचं खरं कारण काय, याची माहिती आपण जाणून घेऊयात.

काय आहे प्रघात?

पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते, अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरुन आढळून येते. त्यामुळे प्राथमिक स्थितीत असणा-या समाजांचे मृतांची पूजा करणे हे एक प्रमुख लक्षण बनले. अत्यंत प्राचीन काळी मृत पूर्वजांचा राग घालवण्याच्या उद्देशाने त्यांना काही पदार्थ अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल आणि त्यांना उद्देशून काही विधी करण्यात येऊ लागले असतील आणि हे त्या मृत पूर्वजांविषयी शुद्ध प्रेमाचे लक्षण म्हणून पुढे चालू राहिले असावे, असे समजले जाते.

ऋणांची परतफेड करणे हा हेतू

पितृपक्ष किंवा श्राद्धपक्ष या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांना किंवा पितरांना स्मरुन त्यांचे श्राद्ध घालण्याची प्रथा आहे.
श्राद्ध हे आपल्या पितरांना अर्थात आपल्या कुळातील हयात नसलेल्या वडीलधाऱ्या लोकांसाठी केले जाते, ज्यात त्यांना भोजन देऊन तृप्त करण्याची मान्यता आहे. पूर्वजांना या निमित्ताने स्मरुन त्यांच्या ऋणांची परतफेड करणे व त्यांना अभिवादन करणे, हा या मागचा मूळ हेतू आहे.

म्हणून कावळ्याला दिले जाते पान

ह्या श्राद्धाचे भोग कावळ्याला घालतात, ईतर प्राण्यांना ते सहसा देत नाही. याचे कारण म्हणजे वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांच्या रोपणात कावळ्याचा वाटा फार मोठा असल्याने त्यांंची संख्या जितकी जास्त तेवढे उत्तम. म्हणून त्यांच्या प्रजननाच्या काळात त्यांना बळ द्यायला म्हणून त्यांनाच हे पितरांच्या नैवेद्याचे पान सहसा वाढले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.