ATM ट्रांजेक्शन अपूर्ण, तरीही पैसे कट झाले? काय कराल

111

देशात डिजिटलाझेशनचे युग आले आणि बँकिंग क्षेत्रात वेगवान बदल झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात डिजिटलायझेसन आणखी वाढल्याचे दिसून आले. काही वर्षांपूर्वी पैसे बँकेतून काढायचे म्हणजे बँकेत जावे लागत होते. त्यानंतर एटीएम कार्ड आले. याकरता डेबिट/रुप-वे कार्डचा वापर केला जाऊ लागला. दरम्यान, सर्वाधिक लोक रोख रक्कम जवळ न बाळगता डेबिट कार्डाचा वापर जास्त प्रमाणात करतात. डेबिट कार्डमुळे गरजेनुसार एटीएममधून रोख रक्कम काढणे सहज सोपे होते. मात्र, अनेकदा एटीएममधून पैसे काढताना काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन व्यवहार (ट्रांजेक्शन) अपूर्ण राहते. म्हणजे खात्यातून पैसे काढले आहेत असा मेसेज ग्राहकाच्या मोबाईलवर तर येतो मात्र एटीएममधून पैसेच येत नाहीत. अशावेळी ग्राहकाची अर्थातच घाबरगुंडी उडते. तुमच्या बाबतीत असे काही झाल्यास अशा परिस्थितीत काय कराल ते जाणून घ्या…

(हेही वाचा- आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून काढता येणार पैसे!)

atm

(हेही वाचा – SBI म्हणते ‘या’ मोबाईल नंबरवरून फोन आला तर उचलू नका; नाहीतर…)

बँकेत लेखी तक्रार नोंदवा

  • कस्टमर केअर सर्व्हिसला तक्रार नोंदवूनही काही तोडगा न निघाल्यास ग्राहक बँकेकडे लेखी तक्रार नोंदवू शकतो.
  • बँकेच्या हेल्पडेस्ककडेही तक्रार नोंदवता येते.
  • तुमच्याकडे ट्रांजेक्शन स्लिप असेल तर ती देखील सादर करता येऊ शकते.
  • तिथे ग्राहकाला नवीन ट्रॅकिंग नंबर मिळतो.
  • या तक्रारीनंतर किमान आठवडाभरात तुमची रक्कम खात्यात जमा होते.

कस्टमर केअर सर्व्हिसला कॉल करा

  • ज्या बँकेचे एटीएम कार्ड वापरून व्यवहार केला त्या बँकेच्या कस्टमर केअर सर्व्हिसशी संपर्क साधावा.
  • ही सेवा २४ तास उपलब्ध असते. या सेवेचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी.
  • कस्टमर केअर सर्व्हिसवरून तुम्हाला तुमचा तक्रार नोंदणी क्रमांक मिळतो.
  • तक्रारीची नोंद झाल्यानंतर पाच दिवसांत ग्राहकाच्या खात्यात पैसे क्रेडिट होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.