मोबाईलमधील डेटा सुरक्षित ठेवायचाय? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

वैयक्तिक कामं करताना किंवा कार्यालयीन कामं करताना आपली सर्व महत्त्वाची माहिती मोबाईल फोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये आपण सेव्ह करून ठेवतो. मोबाईल, लॅपटॉपमुळे जरी आपले जीवनमान सुधारण्यास मदत झाली असली तरी आपली एक लहानशी चूकसुद्धा महागात पडू शकते. तुमच्याकडून देखील अशी एकदा चूक झाली असली आणि मोबाईलमधील सर्व महत्त्वाचा डेटा डिलीट झाला असले, परंतु तीच चूक पून्हा होऊ नये, आपल्या मोबाईलमधील डेटा सुरक्षित रहावा, असे वाटत असेल तर ही बातमी नक्की तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

(हेहीवाचा – Whatsapp: कोणीही वाचू नये असे Secret Chats लपविण्यासाठी ‘या’ Trick करा फॉलो)

असा ठेवा तुमचा डेटा सुरक्षित

  • मोबाईलमधील डेटा संरक्षणासाठी, तुमचा १५ अंकी IMEI क्रमांक लिहून ठेवा.
  • मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरविल्यास पोलीस तक्रार दाखल करताना या क्रमांकाची आवश्यकता भासते.
  • फोनसाठी ऑटोलॉक वापरा किंवा तुम्ही कीपॅड लॉक टाका

आवर्जून पासवर्ड टाका…

  1. डिव्हाइस चोरीला गेल्यास सिमकार्डचा गैरवापर टाळा, यासाठी सिम कार्ड लॉक करण्यासाठी पिन वापरा
  2. मेमरी कार्ड माहिती संरक्षित करण्यासाठी पासवर्डचा वापर करा.
  3. तुमच्या मोबाईलला कुठेही सोडू नका.
  4. वापरात नसताना अॅप्लिकेशन्स आणि कनेक्शन्स बंद करा
  5. डेटाचा नियमित बॅकअप घ्या

स्पॅम मेसेज कसा ब्लॉक कराल?

स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करण्याचे दोन पर्याय आहेत. प्रथम मेसेजिंग अॅपवर जा आणि स्टार्ट टाइप करून १९०९ वर पाठवा. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या फोनवरून १९०९ वर कॉल करा. फोनसाठी डू नॉट डिस्टर्ब सेवा अॅक्टिव्ह करा. या दोन्ही पर्यायामुळे तुमच्या फोनवर येणारे कॉल्स आणि मेसेज मोठ्या प्रमाणात कमी होतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here