गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये युजर्सच्या खासगी डेटाचा भंग होऊन त्याचा गैरवापर झाला आहे. हे लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप वेळोवेळी नवनवीन फिचर घेऊन येत असते, जेणेकरुन यूजर्सचा खासगी डेटा सुरक्षित ठेवता येईल.
हा आहे उद्देश!
व्हॉट्सअॅप हे प्रायव्हसीशी संबंधित एका खास फिचरवर काम करत आहे. या विशेष फिचर अंतर्गत, जर दोन व्हॉट्सअॅप यूजर्स आपापसात बोलत असतील आणि यादरम्यान एका यूजरने चॅटचा स्क्रीन शाॅट घेतला, तर व्हॉट्सअॅप लगेच त्या दुस-या यूजरला नोटिफिकेशन पाठवेल. हे फिचर आणण्यामागचा उद्देश युजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हा आहे. फिचर अंतर्गत, इतर कोणीतरी चॅटचा स्क्रीनशाॅट घेताच व्हॉट्सअॅप ही माहिती लगेचच पहिल्या यूजरला नोटिफिकेशनच्या स्वरुपात देईल.
लवकरच येणार वापरात
जेव्हा दुसरा यूजर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवलेला संदेश वाचतो. त्यादरम्यान संदेशाच्या खाली डबल ब्लू टिक दिसायला लागते. त्याचवेळी, हे नवीन फिचर आल्यानंतर, दुस-या व्यक्तीने तुमच्या मेसेजचा स्क्रीनशाॅट घेताच मेसेजच्या तळाशी तीन टिक्स दिसतील. हे फीचर अद्याप रिलीज झालेले नाही. यावर काम सुरु आहे. लवकरच या नवीन फिचरची चाचणी देखील सुरु होणार आहे. एकदा चाचणी यशस्वी झाली की, हे नवीन फिचर प्रसिद्ध केले जाणार आहे.
( हेही वाचा :बापरे! रुग्णालयांत इंजेक्शन देण्यासाठी सुईच मिळणार नाही )
Join Our WhatsApp Community