WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपवर करता येईल Online स्टेटस Hide; लवकरच येतील हे ३ नवे फिचर्स

125

व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसीबाबत प्रत्येकजण काळजी घेत असतो. युजर्सना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप लवकरच काही नवे फिचर्स लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या फिचर अंतर्गत युजर्सना ग्रुप लेफ्ट करताना, व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रिनशॉट काढणे ब्लॉक करू शकता. हे नवे फिचर्स नेमके कसे असतील जाणून घेऊया…

( हेही वाचा : Rupee bank : रिझर्व्ह बॅंकेकडून पुण्यातील रुपी बॅंकेचा परवाना रद्द )

नवे फिचर्स कसे असतील?

ऑनलाईन स्टेटस

तुम्ही जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप वापरता तेव्हा अनेकजण तुम्ही ऑनलाईन आहात की नाही हे चेक करतात. आता मात्र ऑनलाईन असताना कोणी पहावं किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच तुम्ही तुमचा ऑनलाईन स्टेटस काही विशिष्ट युजर्सपासून हाईड सुद्धा करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप हे फिचर या महिन्याच्या अखेरिस रोल आऊट करण्याची शक्यता आहे.

व्ह्यू वन्सचा मेसेजचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपने अलिकडेच व्ह्यू वन्सचा पर्याय दिला होता. परंतु त्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढण्याची मुभा सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप सध्या देते. परंतु नव्या फिचरमुळे तुम्ही व्ह्यू वन्स फोटो पाठवताना आधीच स्क्रिनशॉट काढण्याचा ऑप्शन ब्लॉक करू शकता. या फिचरची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हे फिचर रोलआऊट होईल.

ग्रुप लेफ्ट

आपल्याला नको असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडताना लेफ्ट असे लिहून येते आणि यामुळे लेफ्ट झाल्यावर ग्रुपमध्ये सुद्धा चर्चा रंगते यामुळे ग्रुप लेफ्ट करताना अनेकांची पंचायत होते, परंतु आता ग्रुपमधून बाहेर पडल्यावर लेफ्ट असे लिहून येणार नाही. केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच ग्रुप लेफ्ट केल्याची माहिती मिळेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.