बापरे! आता क्रिप्टोची देवाणघेवाण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होणार

126

क्रिप्टो करन्सी हे भविष्य असल्याने व्हॉट्सअ‍ॅपने मोठी घोषणा करत आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही क्रिप्टो करन्सी पाठवता येणार असल्याचं सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप  हे मेटा (पूर्वीचे Facebook) च्या मालकीचे अॅप आहे. हे वैशिष्ट्य मेटाच्या डिजिटल वॉलेट नोवीवर आधारित आहे. सध्या हे फीचर फक्त टेस्टींगसाठी लाॅंच करण्यात आले आहे. तसेच, ते मर्यादित लोकांना वापरासाठी सुरु करण्यात आलं आहे.

पेमेंंट होणार तात्काळ

क्रिर्टो करन्सी ट्रान्सफर करणं चॅटमध्ये अडथळा बनणार नाही. चॅट करत असतानाच करन्सी ट्रान्सफर करता येणार आहे. अशी घोषणा व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कैथकार्ट यांनी केली आहे. व्हाॅट्सअॅपवरुन एखादी साधी अॅट्याच्ड फाईल पाठवण्याइतकं करन्सी सेंड करणं सोपं असणारं आहे. हे फीचर सध्या अमेरिकेत लाॅंच करण्यात आले आहे.  अॅंड्रॅाइड आणि आयफोन दोन्ही मध्ये हे फीचर उपलब्ध असणार आहे. क्रिप्टो करन्सी पाठवण्यासाठी यूजर्सला चॅटमध्ये पेपर क्लिप या आयकाॅनवर क्लिक करुन टॅप करुन पेमेंट सिलेक्ट करावं लागेलं. क्रिप्टो करन्सी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार नाहीत. क्रिप्टो करन्सी सेंड वा रिसिव्ह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जाणार नाही.असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच, कंपनीनुसार हे पेमेंट तात्काळ होणार आहे.

फेसबुकसुद्धा या यादीत

फेसबुकनेसुद्धा क्रिप्टो करन्सीच्या ट्रान्सफरच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी काम सुरु केले होते. त्यामुळे येत्या काही वर्षांत फेसबुक तसेच इन्टाग्राम मध्येही असे फीचर येण्याची शक्यता आहे.

 ( हेही वाचा: सर्पमित्रांचे ओळखपत्र आणि युट्युब चॅनलही बोगस )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.