डेस्कटॉप व्हॉट्सअप युजर्ससाठी Whatsappने आता एक नवीन फीचर लाँच केले आहे. व्हॉट्सअपने आता ड्सेकटॉप बीटा युजर्ससाठी नवीन इमेज ब्लर टूल विकसित केले आहे. याद्वारे युजर्सना संवेदनशील चॅट,माहिती किंवा फोटोतील नको असलेला भाग ब्लर करता येणार आहे. Blur Tool असे नाव या टूलला देण्यात आले आहे. हे टूल Whatsapp Desktop Beta 2.2241.2 साठी सादर करण्यात आलं आहे.
काय आहे नवे फीचर?
अलिकडेचा या नव्या फीचरची टेस्ट करण्यात आली आहे. जून 2022 मध्येच कंपनीने या ब्लर टूलबाबत सूतोवाच केले होते. डेस्कटॉप बीटासाठी ब्लर फीचर विकसित करण्यात येत असून त्यावर काम सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. त्याची टेस्टिंग सध्या सुरू आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर सर्व व्हॉट्सअप युजर्सना वापरपता येईल, असे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः सुट्ट्या संपल्या आता कामाला लागा, नोव्हेंबरमध्ये बँक हॉलिडेचा दुष्काळ)
या नव्या ब्लर टूल फीचरमुळे फोटामधील नको असलेला भाग सिलेक्ट करुन यूजर्स तो ब्लर करू शकतात. हे ब्लर टूल कशा पद्धतीने कार्य करेल याबाबतचा स्क्रीनशॉट देखील Whatsapp Beta कडून शेअर करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community