चुकूनही ‘हे’ APP डाऊनलोड करू नका, अन्यथा…; WhatsApp ने दिला इशारा

156

आता सगळेच स्मार्टफोन वापरत आहेत, अशी फार कमी लोकं सापडतील जे स्मार्टफोन वापरत नसतील. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही देखील कोणतीही खात्री न करता तुमच्या फोनमध्ये कोणतेही अॅप डाऊनलोड करत असाल तर सावध व्हा… असे काही धोकादायक अॅप आहे जे तुमची सगळी वैयक्तिक माहिती हॅक करू शकतात. तुम्ही देखील तुमच्या फोनवर कधीही हे अॅप डाऊनलोड करू नका, व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी या धोकादायक अॅपबाबत युजर्सना सावध केले आहे.

WhatsApp ने दिला इशारा

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ते अॅप नेमके कोणते आहेत ज्या अॅपबद्दल सतर्क रहायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या धोकादायक अॅप्समध्ये HeyMods डेव्हलपर्सच्या Hey WhatsApp अॅपचा उल्लेख केला जात आहे. या अॅपवर असे अनेक नवीन फीचर्स आहेत जे व्हॉट्सअॅपवर वापरता येतात. या फीचर्समुळे यूजर्स अॅप डाऊनलोड करत आहेत आणि त्यांचा महत्त्वाचा डाटा गमावत आहेत. हे चॅटिंग अॅप बनावट आहे आणि तुम्ही ते डाउनलोड करू नये, यासाठी व्हॉट्सअॅपचे सीईओ यांच्याकडून इशारा देण्यात आला आहे.

(हेही वाचा – तुम्ही चहाचे शौकिन आहात? तर चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी)

… नाहीतर होणार मोठे नुकसान 

Hey WhatsApp हे चॅटिंग अॅप आहे जे व्हॉट्सअॅपचे बनावट आणि धोकादायक व्हर्जन आहे. यामध्ये कित्येक फीचर्सही दिले जात असल्याने लोकं ते सर्वाधिक डाऊनलोड करताना दिसत आहे. पण हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते फीचर्स त्यात नसल्याचे सांगितले जात आहे. या फीचर्सच्या लालसेमुळे डाउनलोड होत असलेले हे अॅप (End-to-End Encryption सह येत नाही. हेच कारण आहे की याद्वारे हॅकर्स क्षणार्धात तुमच्या चॅट्स आणि इतर महत्त्वाचा डाटा चोरू शकतात. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, परंतु ते अनव्हेरिफाइड सोर्सेजकडून डाऊनलोड केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.