व्हॉट्सअ‍ॅप चॅट Android मधून iPhone मध्ये होणार ट्रान्सफर! मार्क झुकरबर्गने केली घोषणा

90

जगभरातील लाखो युजर्स व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करतात. अनेक युजर्स ज्या फिचरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते फिचर व्हॉट्सअ‍ॅपने अखेर सुरू केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप चॅट Android फोनमधून iPhone मध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. मार्क झुकरबर्गने याबाबत स्वत: सोशल मिडियाच्या माध्यमातून ट्वीट करत माहिती दिली आहे.

( हेही वाचा : सीएसएमटी-कर्जत रेल्वे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार)

Android फोनमधून iPhone मध्ये ट्रान्सफर होणार व्हॉट्सअ‍ॅप चॅट

अखेर ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती त्या फिचरचा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे याद्वारे Android फोन युजर्स व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये सहज iPhone मध्ये ट्रान्सफर करू शकतात. याद्वारे युजर्स चॅट history, फोटो, व्हिडिओ आणि वॉइस मेसेज इत्यादी डेटा ट्रान्सफर करू शकतात.


( हेही वाचा : मुंबईतील ‘बेस्ट’ Bus Stop सुशोभित होणार!)

व्हॉट्सअ‍ॅपने गेल्यावर्षी iOS मधून Android मध्ये चॅट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली होती यानंतर आता Android मधून iOS मध्ये चॅटला ट्रान्सफर करण्याचे फिचर उपलब्ध करून दिले आहे. ही सुविधा केवळ Android 5 व त्यावरील Android device आणि iOS 15.5 वरील डिव्हाइसमध्ये उपलब्ध असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.