फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टा बंद पाडणारा सापडला! कोण आहे ‘तो’?

'थॉमस' मुळे संपूर्ण जगाला आउटेजचा सामना करावा लागला आहे. 

70

सोमवारी, रात्रीपासून तब्बल ८ तास फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टा हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म बंद होते. त्यामुळे झुकरबर्ग यांना याचा मोठा फटका बसला. त्यावेळी मात्र ट्विटर, टेलिग्राम या मॅसेंजरला टट्रॅफिक वाढले होते. जगभरात याचा जबरदस्त फटका बसला आहे. अखेर यामागील सूत्रधार कोण होता, याचा शोध लावण्यात यश आले आहे. यामागे थॉमस नावाचा व्यक्ती कारणीभूत होता, असे समोर आले आहे.

(हेही वाचा : सोशल मीडिया ठप्प, नेटकरी बैचेन!)

सोशल मीडियातील हे महत्वाचे प्लॅटफॉर्म बंद पडल्यामुळे जगभरातील यूजर्सचे मेसेज, कॉल्स, इतकेच काय तर ऑफिसचे कामसुद्धा ठप्प झाले. एकमेकांशी संवाद साधणे कठीण झाले. हा प्रकार प्रथमच घडल्याचे बोलले जात आहे. या सर्व फेसबुकच्या मालकीचे अप्लिकेशन्स बंद होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण आता यामध्ये एक धक्कादायक कारण समोर आले आहे. ‘थॉमस’ मुळे संपूर्ण जगाला आणि कंपनीला या आउटेजचा सामना करावा लागला आहे.

कोण आहे थॉमस? 

हा थॉमस हा अमेरिकेतील एक मोठा हॅकर आहे. त्यानं या आधी अनेकमोठमोठ्या सिस्टम हॅक केल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक सायबर गुन्हे दाखल आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा एफबीआयने ही माहिती दिली आहे. लवकरच एफबीआय थॉमसला ताब्यात घेणार आहे. यासंबंधीची संपूर्ण जबाबदारी एफबीआय अधिकारी जॉन मैकक्लेन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.