लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर ५०० हून अधिकांचा ग्रुप तयार करता येणार!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम असून भारतातही याचे सर्वाधिक युजर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप कडून यूजर्ससाठी नव-नवे फिचर्स लाँच केले जात असतात. अशाच व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅप लवकरच नवीन फीचर्स घेऊन येणार आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप ग्रुप संदर्भात असणार असून व्हॉट्सअॅप ग्रुपवर आता ५१२ जणांना सहभागी करून घेता येणार आहे.

सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपची मर्यादा २५६ सदस्यांची असून ती आता दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवरून २ जीबी आकाराची फाईलही पाठवता येऊ शकणार आहे. व्हॉट्सॲपची ही नवीन फीचर्स आयओएस आणि अँड्रॉईड फोनवर उपलब्ध असतील. येत्या काही आठवड्यांत नवीन फीचर्स लाँच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करतात. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन व्हॉइस नोट्सचं फीचर्स लाँच केले होते. यामुळे व्हॉइस नोट्स पाठवणे आणि रिसिव्ह करणे अधिक सोयीचे होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने केले नवे फिचर्स लॉंच

  • आउट ऑफ चॅट प्लेबॅक या फिचरमुळे व्हॉइस मेसेज ऐकताना आपण मल्टीटास्किंगसह इतर लोकांनाही मेसेज करू शकतो.
  • पॉज आणि रिज्यूम या फिचरमुळे आपण व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना मध्येच पॉज (Pause) म्हणजेच थांबू शकतो. यामुळे आपण सोयीनुसार resume व pause करत व्हाइस रेकॉर्डिंग करू शकतो.
  • वेवफॉर्म व्हिज्यूअलायजेशन आणि ड्राफ्ट प्रिव्ह्यू या फिचरमुळे व्हॉइस नोट पाठवण्याआधी यूजर्सला ड्राफ्ट प्रिव्ह्यूमध्ये ते ऐकता देखील येईल.
  • रिमेंबर प्लेबॅक आणि फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्ड मेसेज या फिचरमुळे यूजर्सला व्हॉइस मेसेज १.५x आणि २x या स्पीडवर प्ले करण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. हे फिचर अद्याप लॉंच झालेले नाही. लवकरच सर्व यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध होतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here