Whatsapp वर सुद्धा येणार Do Not Disturb फीचर, युजर्सना असा होणार फायदा

138

सध्या Whstsapp इन्स्ंटट मेसेजिंग प्लॅटफॉर्म संपूर्ण जगभरात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे आपल्या युजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. नुकतेच कंपनीने ग्रुप मेंबर्सच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कंपनी व्हॉट्सअपवर Do Not Disturb चा पर्याय आणणार आहे. याचा युजर्सना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे फीचर?

या फीचरद्वारे आपल्याला नको असलेल्या व्यक्तींचे नंबर आपण Do Not Disturb यादीत टाकू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींचे कॉल किंवा मेसेज नोटिफिकेशन आपल्याला येणार नाही. या नंबरच्या खाली Silenced by Do Not Disturb असा ऑप्शन दिसेल. यामुळे थेट ब्लॉक करण्यापेक्षा हा पर्याय युजर्ससाठी उपयोगी ठरणारा आहे. WABetaInfo ने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच हे फीचर आणण्यात येणार असून, व्हॉट्सअप सेटिंगमध्ये जाऊन युजर्सना हा मोड अॅक्टिवेट करता येणार आहे.

(हेही वाचाः UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा)

व्हॉट्सअपचे नवीन अपडेट

नुकतीच व्हॉट्सअपने व्हिडिओ कॉलसाठीची मर्यादा 8 वरुन वाढवून आता 32 इतकी केली आहे. तसेच व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांची आधीची संख्या 512 होती ती वाढवून आता 1 हजार 24 इतकी करण्यात आली आहे. तसेच एकाच वेळी युजर्स 2 जीबी पर्यंत डेटा म्हणजेच फोटो,व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.