तुम्ही WhatsApp ग्रृपचे अ‍ॅडमिन आहात का? वाचा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

161

सध्या सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारं अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉटस्अप. या व्हॉट्सअप अॅप्लिकेशनचा वापर तुम्ही देखील करत असालच. इतकेच नाही तर त्यातील कित्येक ग्रृपचे तुम्ही अॅडमिनही असाल. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी समोर आली होती, ती म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रृपमधील कोणत्याही व्यक्तीने आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला तर त्याची जबाबदारी पूर्णपणे अॅडमिनची होती. त्यामुळे अॅडमिनवर काहिसे दडपण होते. मात्र आता अनेक यूजर्सना दिलासा मिळणार आहे. कारण केरळ हायकोर्टाने व्हॉट्सअॅप ग्रुप्सबाबत एक निर्णय दिला आहे.

काय दिला हायकोर्टाने निर्णय

हायकोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणताही संदेश (आक्षेपार्ह) आल्यास ग्रुप अॅडमिन अप्रत्यक्षपणे जबाबदार राहणार नाही. कोर्टाचा हा निर्णय व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये अॅडमिन असलेल्या लोकांना मोठा दिलासा देणारा आहे.

(हेही वाचा – किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ यादीतील ‘हे’ आहेत नवे ‘डर्टी’ !)

आक्षेपार्ह व्हिडिओवर निकाल दिला

व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओवर केरळ हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. मार्च 2020 मध्ये ‘फ्रेंड्स’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. एका व्यक्तीने ‘फ्रेंड्स’ नावाने हा ग्रुप बनवला होता, ज्यामध्ये आणखी दोन लोकांना त्या ग्रुपचे अॅडमिन बनवले होते. त्यांच्यापैकी एकाने ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये मुले सहभागी होती. यानंतर, पोलिसांनी ग्रुप बनवणाऱ्या पहिल्या व्यक्तीसह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर ग्रुप अॅडमिनने कोर्टात दाद मागितली.

म्हणून अॅडमिनची कोणतीही जबाबदारी नसेल

न्यायालयाने म्हटले की, व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटरला इतर सदस्यांच्या तुलनेत ग्रुपमधून एखाद्याला अॅड करण्याचा किंवा काढून टाकण्याचा एकच अधिकार आहे. केरळ उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, कोणताही सदस्य ग्रुपमध्ये काय पोस्ट करत आहे यावर अॅडमिनचे शारीरिक किंवा इतर कोणतेही नियंत्रण नसते. तो ग्रृपमधील संदेश सेन्सॉर किंवा मॉडरेट करू शकत नाही. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन केवळ त्या क्षमतेनुसार काम करतो, ग्रुपच्या कोणत्याही सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह सामग्रीसाठी जबाबदार धरता येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.