जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि इंस्टाग्राम यांचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे नेटकरी पावून तास बैचेन बनले होते. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येऊ लागल्याने यामागील नेमके कारण काय हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांचा प्रतिक्रियांचा आणि मिम्सचा पाऊस पडला.
सर्व्हर अचानकपणे बंद!
व्हॉट्सअॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या. मेसेजिंग, व्हिडिओ कॉल, ग्रूप चॅट ही सर्व फिचर्स बंद पडली. हा प्रकार साधारणपणे मागील पाऊण तास सुरु होता. व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
(हेही वाचा : आर्यन खानला होणार 10 वर्षांची शिक्षा?)
फेसबूक, इंस्टाही फ्लॉप
यानंतर फेसबूक तसेच इंस्टाग्रामचेही सर्व्हर डाउन झाले. कोणतेही संदेश जात किंवा येत नाही. संदेश वाहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे ही अडचण नेमकी का येते, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे नेटकऱ्यांची ट्विटरवर झुंबड उडाली.
WhatsApp,Facebook,and Instagram down again,the world right now switching to Twitter 😂😂#WhatsApp #facebookdown #Instagram pic.twitter.com/XpRyM4N5Jj
— Kunal GuRu (@KunalGuRu11) October 4, 2021
जगभरात या तिन्ही सोशल नेटवर्किंग अॅप्सचा वापर केला जातो.व्हॉट्सअपच्या माध्यमातून दर मिनिटाला कितीतरी मेसेजेसची देवाणघेवाण होत असते. पण ही सेवा सोमवार रात्रीपासून बंद झाली आहे. तसेच फेसबूक व इन्स्टाग्रामचे न्यूज फीड रिफ्रेश होत नसून, फेसबूक मॅसेंजर व इन्स्टा चॅटची सेवाही बंद झाली आहे. सर्व्हर डोऊन झाल्यामुळे हा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Scenes at the WhatsApp Facebook and Instagram headquarters pic.twitter.com/T22hwdcthy
— Mwami Laban (@Johnlaban256) October 4, 2021
वेबसाईट आणि सर्व्हिसचे ट्रॅकिंग करणा-या डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, असंख्य व्हॉट्सअप युजर्सनी मेसेजचे आदानप्रदान होत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. डाऊनडिटेक्टर वेबसाईटवर व्हॉट्सअप क्रॅशच्या हजारो तक्रारी आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community