WhatsApp चे नवे फिचर; Block झालेले अकाउंट पुन्हा करता येणार सुरू…

व्हॉट्सअ‍ॅप  ( WhatsApp) हे जगभरात सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. यामार्फत तुम्ही फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सुद्धा शेअर करू शकता. एखाद्या युजरकडून काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास त्या युजरचे अकाउंट ब्लॉक केले जाते. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक झाल्यावर युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता नव्या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक झालेले अकाउंट आपल्याला पुन्हा अनब्लॉक करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनब्लॉक करण्यासाठी नवे फिचर 

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक झाल्यावर युजर्सला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक नवे फिचर रोलआउट करणार आहे. या फिचरच्या माध्यमातून ज्या युजरचे अकाउंट ब्लॉक किंवा बॅन करण्यात आले आहे ते त्यांना पुन्हा सुरू करता येईल. येत्या आठवड्यात हे फिचर iOS साठी जारी करण्यात येणार आहे. या फिचरव्यतिरिक्त तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टला तुमचे अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी ई-मेल करून सुद्धा विनंती करू शकता.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! 8,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती)

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचरच्या माध्यमातून बॅन किंवा ब्लॉक झालेले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. WABetaInfo च्या अहवालानुसार युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर एक ऑप्शन उपलब्ध होईल या ऑप्शनच्या माध्यमातून युजर्सना त्यांचे ब्लॉक केलेले अकाउंट पुन्हा सुरू करता येईल. अकाउंट पुन्हा रिस्टोअर करण्यासाठी युजरच्या अकाउंटवर कोणतीही अनुचित अ‍ॅक्टिव्हिटी होत नाही ना हे तपासले जाईल त्यानंतर आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत तरच तुमचे अकाउंट पुन्हा सुरू होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here