व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर; आता कोणाच्याही नकळत होता येणार Group मधून Left

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर Android, IOS आणि डेस्कटॉपवरही उपलब्ध असेल. WAbetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा सदस्य ग्रुप मधील इतरांना न कळताच शांतपणे ग्रुपमधून बाहेर पडू शकतो. सदस्य लेफ्ट झाल्यावर केवळ ग्रुप अ‍ॅडमिनला सूचित केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युजर या फिचरची मागणी करत होते.

( हेही वाचा : आता Road Trip होणार सुरक्षित! १ ऑक्टोबरपासून गाडीच्या टायर्स संदर्भात नवे नियम )

ग्रुप अ‍ॅडमिनलाच माहिती मिळेल

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक नवे फिचर येणार आहे. या नव्या फिचरची युजर्स अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. आपल्याला नको असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडताना लेफ्ट असे लिहून येते आणि यामुळे लेफ्ट झाल्यावर ग्रुपमध्ये सुद्धा चर्चा रंगते यामुळे ग्रुप लेफ्ट करताना अनेकांची पंचायत होते, परंतु आता ग्रुपमधून बाहेर पडल्यावर लेफ्ट असे लिहून येणार नाही. केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच ग्रुप लेफ्ट केल्याची माहिती मिळेल.

एडिट फिचर 

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एडिट बटण फिचर सुद्धा येणार आहे. युजर्स आता मेसेज केल्यावर एडिट करू शकणार आहेत. एडिट फिचरवर काम करण्यास व्हॉट्सअ‍ॅपने पाच वर्षांपूर्वी सुरूवात केली होती. अखेर, पाच वर्षांनंतर व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एडिट फिचरवर काम करण्याचा विचार केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here