व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपचा उपयोग जगभरातील लाखो युजर्स करतात. प्रत्येकाच्या जीवनात व्हॉट्सअॅप एका महत्त्वाचा भाग आहे. व्हॉट्सअॅप आता मेटा कंपनीचे असल्याने मेटाच्या इतर अॅप्सप्रमाणे व्हॉट्सअॅपवर सुद्धा लवकरच अवतार हे नवे फिचर येणार आहे.
Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आता नवे फिचर सुरू करण्याच्या तयारीत असून आता युजर्स स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम या अॅपप्रमाणे व्हॉट्सअॅपवर सुद्धा स्वत:चा विशेष अवतार क्रिएट करू शकतात.
अवतार फिचर कसे असेल पहा फोटो
स्वत:चा फेस स्कॅन करून तुम्ही तुमचा लूक या अवतारमध्ये सेट करू शकता.
व्हॉट्सअॅपचे इतर नवे फिचर
दरम्यान, तुम्ही जेव्हा व्हॉट्सअॅप वापरता तेव्हा अनेकजण तुम्ही ऑनलाईन आहात की नाही हे चेक करतात. आता मात्र ऑनलाईन असताना कोणी पहावं किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच तुम्ही तुमचा ऑनलाईन स्टेटस काही विशिष्ट युजर्सपासून हाईड सुद्धा करू शकता. व्हॉट्सअॅप हे फिचर या महिन्याच्या अखेरिस रोल आऊट करण्याची शक्यता आहे. तसेच आपल्याला नको असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडताना लेफ्ट असे लिहून येते आणि यामुळे लेफ्ट झाल्यावर ग्रुपमध्ये सुद्धा चर्चा रंगते यामुळे ग्रुप लेफ्ट करताना अनेकांची पंचायत होते, परंतु आता ग्रुपमधून बाहेर पडल्यावर लेफ्ट असे लिहून येणार नाही. केवळ ग्रुप अॅडमिनलाच ग्रुप लेफ्ट केल्याची माहिती मिळेल.
Join Our WhatsApp Community