Whatsapp Pay: आता व्हाॅट्सॲपवरुन ‘असे’ करा बॅंक बॅलन्स चेक

तुम्हाला आता व्हाटसअॅपवरुन फक्त चॅट नाही तर पैशांची देवाण-घेवाणसुध्दा करता येणार आहे. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर येथे सविस्तर माहिती जाणून घ्या.

सध्या ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. लोक रोख पैशाची देवाण घेवाण करण्याऐवजी ऑनलाईन पेमेंटला प्राधन्य देतात. मात्र अनेक जणांना व्हाट्सअॅरचा वापर फोटो, व्हिडीओ आणि चॅटऐवजी पेमेंटसाठीसुध्दा करता येतो हे माहित नाही. तुम्हाला इतर UPI पेमेंटप्रमाणे व्हॉट्सअॅपद्वारेही UPI पेमेंट करता येणार आहे. सध्या व्हॉट्सॲप UPI पेमेंट करणाऱ्या टॉप अॅप्सच्या यादीत नाही. फोनपे हे UPI Payment साठीचं पहिल्या क्रमांकाचं ॲप आहे.

Whatsapp Payment साठी आवश्यक गोष्टी:

  • कोणत्याही बॅंकेत आपले खाते असणे आवश्यक आहे.
  •  व्हॉटस्ऍपला मोबाईल क्रमांक बॅंक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे.
  • बँक खात्याला जो मोबाइल क्रमांक लिंक आहे ते सिम कार्ड मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे.

Whatsapp Pay कसे करावे?

  • सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरु करून उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर पेमेंट या ऑप्शन वर क्लिक करुन Add New Account वर क्लिक करा.
  • त्यानंतर व्हॉट्सअॅप आपल्याला काही नियम व अटी स्वीकारण्यास सांगेल त्याचा स्वीकार करण्यासाठी I Agree या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपला व्हाट्सअँप मोबाईल नंबर जो आपल्या बँक खात्याला लिंक असेल तो नंबर Verify करण्यासाठी एक SMS येईल.
  • आपला मोबाईल क्रमांक Verify झाल्यावर एक बँकांची यादी येईल त्यामध्ये आपले ज्या बँकेमध्ये खाते असेल ती बँक निवडा. जर आपले खाते असलेली बँक यादीमध्ये नसेल तर आपल्याला व्हाट्सअँप पेमेंटचा वापर करता येणार नाही.
  • Verification पूर्ण झाल्यावर तुम्ही पैसे पाठवण्यास किवा स्वीकारण्यास सुरुवात करु शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here