जगभरात लोकप्रिय असलेले Messeging app व्हॉट्सअपकडून आपल्या युजर्सना नवनवीन फीचर्स देण्यात येतात. युजर्सना जास्तीत जास्त चांगला मेसेजिंग अनुभव देणे हे व्हॉट्सअपचे उद्दिष्ट आहे. आता Whatsapp Status मध्ये कंपनीकडून एक नवीन फीचर अपडेट आणण्यात आले आहे. यामुळे युजर्स आता व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आपल्या मित्र-मैत्रणींना व्हॉईस नोट देखील शेअर करू शकणार आहेत.
काय आहे नवीन फीचर?
या नव्या फीचरमुळे आता व्हॉट्सअप स्टेटसवर आपल्याला व्हॉईस नोट देखील शेअर करता येणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप स्टेटस सेटिंगमध्ये एक नवा ऑप्शन देण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तींना व्हॉईस नोट शेअर करता येणार आहे. Wabetainfo या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे फोटो, व्हिडिओंसोबतच आता व्हॉट्सअपवर व्हॉईस नोटही शेअर करता येईल. हे व्हॉईस नोटसुद्धा एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल.
(हेही वाचाः राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांत असे असतील नवे दर)
रिअॅक्शन फीचर होणार अपडेट
व्हॉईस स्टेटस या नावाने हे नवे फीचर लॉन्च केले जाऊ शकते. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे, लवकरच हे फीचर युजर्सच्या भेटीला येणार आहे. तसेच व्हॉट्सअपने नुकत्याच लॉंच केलेल्या मेसेज रिअॅक्शन फीचरमध्ये देखील नवे बदल करण्यात येणार आहेत. या फीचरमध्ये सध्या 6 इमोजी आहेत, पण आता यामध्ये वाढ करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community