सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपमुळे कोणाशीही कधीही बोलता येणं शक्य होत असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर करोडो लोक करतात. पण तुमच्या जोडीदार, पार्टनरसोबत वैयक्तिक चॅट करत असताना ते मेसेज कोणी वाचणार नाही ना अशी भीती असते. पण एका भन्नाट ट्रिकने तुम्ही तुमच्या गप्पा, सीक्रेट चॅट्स लपवू शकतात. त्यासाठी तुम्हाला चॅट डिलीट करण्याची गरज नाही आणि मोबाईल लपवण्याचीही गरज नाही. तुम्ही ते चॅट पुन्हा वाचू शकता किंवा तेथून तुमचे बोलणे पुन्हा सुरू करू शकता.
जर तुम्ही Android वापरत असाल तर…
तुमचे सिक्रेट चॅट कोणाला कळू द्यायचे नसेल तर अँड्रॉईड युजर्सना व्हॉट्सअॅप चॅटवर जावे लागेल. तुम्हाला ज्याची चॅट हाईड करायची आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला वर Archive चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास ती ठराविक चॅट हाईड होईल. यानंतर जर तुमचा फोन कोणी पाहिला तरी त्याला ती सिक्रेट चॅट कळणार नाहीत.
iPhone युजर्ससाठी काय आहे ट्रिक
iPhone युजर्सना वैयक्तिक चॅट लपवण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट्सवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लपवायच्या असलेल्या चॅटवर स्वाइप करा. ऑप्शनमध्ये तुम्हाला archive चा पर्याय दिसेल. एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे चॅट हाईड झालेले दिसेल.
हाईड झालेली चॅट जाणार कुठे?
तुम्ही तुमची चॅट Archive करताच, ही चॅट व्हॉट्सअॅपच्या तळाशी किंवा वरच्या बाजूला दिसेल. या ट्रिकनंतर, जर कोणी तुमचे व्हॉट्सअॅप उघडले तर त्याला वरील वैयक्तिक चॅट दिसणार नाहीत. फक्त तुम्हाला ही सिक्रेट चॅट कुठे असेल याची माहिती असेल.