आता दोन दिवसांनी सुद्धा करता येणार WhatsApp मेसेज ‘डिलीट फॉर एव्हरीवन’

107

सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपमुळे कोणाशीही कधीही बोलता येणं शक्य होत असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर करोडो लोक करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना नव-नवीन फीचर्स देत असतात. असंच एक नवं फीचर्स व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येणार आहे. तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्यानंतर जर तो नको असेल तर काही ठराविक वेळात ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करण्याची सुविधा कंपनीने दिलेली आहे. पण आता या वेळेची मर्यादा वाढवण्याचा विचार व्हॉट्सअॅपने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

(हेही वाचा – WhatsApp वरही करता येणार Call रेकॉर्डिंग? कसं ते जाणून घ्या)

मेसेज डिलीट करण्यास सध्या किती वेळ?

  • सध्या १ तास ८ मिनिट आणि १६ सेकंद इतक्या वेळात एखादा मेसेज डिलीट करता येतो.
  • २०१७ मध्ये व्हॉट्सअॅपने मेसेज डिलीट करण्याची ही सेवा सुरू केली होती. त्यावेळी केवळ ८ मिनिटांत आपल्याला मेसेज डिलीट करता येत होता.
  • त्यानंतर ही सेवा लोकप्रिय होत असल्याचे दिसताच व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर ऑल हे नवीन फीचर सुरू केले. शिवाय त्याचा कालावधीही वाढवला होता.

(हेही वाचा – Whatsapp: कोणीही वाचू नये असे Secret Chats लपविण्यासाठी ‘या’ Trick करा फॉलो)

मेसेज डिलीट करण्यासाठी किती वेळ मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सअपवर २ दिवस १२ तास एवढा वेळ एखादा मेसेज ‘डिलीट फॉर एव्हरी वन’ करण्यासाठी मिळू शकतो. असेही सांगितले जात आहे की, एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याची सेवाही ग्रुप अॅडमिनला व्हॉट्सअॅप लवकरच देऊ शकते. त्यामुळे ग्रुपमध्ये कोणी टाकलेला मेसेज जर अॅडमिनला आक्षेपार्ह वाटला तर अॅडमिन तो डिलीट करू शकणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.