आता WhatsApp वरून एक्सेस करता येणार DigiLocker!

तुमच्याकडे खूप सारे मोबाईल अॅप्लिकेशन्स असतील आणि जर तुम्हाला हे सर्व अॅप्स ठेवण्याचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारेही डिजिलॉकर एक्सेस करू शकणार आहात. याद्वारे तुम्ही तुमचे दस्तऐवज डाउनलोड करू शकतात. सरकारने ही सुविधा MyGov हेल्पडेस्क चॅटबॉटवर दिली आहे. दरम्यान, तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप असेल, तर तुम्हाला डिजीलॉकर अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची गरज नाही. डिजीलॉकर वेब आणि मोबाईल अॅप दोन्हीद्वारे ऍक्सेस करणं शक्य होणार आहे.

असे डाऊनलोड करा DigiLocker डॉक्युमेंट्स

सर्वात प्रथम तुम्हाला +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागणार आहे. आता व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप ओपन करून DigiLocker टाइप करून पाठवा. आता तुम्हाला पॅनकार्डपासून प्रमाणपत्रापर्यंतचे पर्याय उपलब्ध होतील. डिजीलॉकर अॅपप्रमाणे व्हॉट्सअॅपवर आधार क्रमांकाद्वारे व्हेरिफिकेशन केले जाईल. यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमचा दस्तऐवज डाऊनलोड करू शकाल. हे व्हॉट्सअॅपद्वारे लसीचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याच्या पद्धतीप्रमाणेच असेल.

2020 मध्ये सुरू झाले हेल्पडेस्क

मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीबद्दल माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर MyGov हेल्पडेस्क सुरू करण्यात आले होते. लॉन्चच्या अवघ्या 10 दिवसांत 1.7 कोटी लोक त्याच्याशी जोडले गेले. हे कोरोना महामारीबद्दल जागरूकता करण्यासाठी सुरू करण्यात आले होते, परंतु आता ते ई-कॉमर्स सेवांसाठी वापरले जात आहे. MyGov हेल्पडेस्कच्या युजर्सची संख्या आता 8 कोटी झाली आहे. याद्वारे आतापर्यंत 3.3 कोटी लोकांनी लस प्रमाणपत्र डाउनलोड केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here