व्हॉट्सअ‍ॅपमुळे मैत्री होणार पक्की, येणार आहे ‘हे’ खास फिचर

239
व्हॉट्सअ‍ॅपमुळे मैत्री होणार पक्की, येणार आहे 'हे' खास फिचर
व्हॉट्सअ‍ॅपमुळे मैत्री होणार पक्की, येणार आहे 'हे' खास फिचर

जगभरात पसरलेल्या कोट्यवधी युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सतत काही ना काही अपडेट्स घेऊन येत असते. व्हॉट्सअ‍ॅपला एक गो-टू अ‍ॅप बनवण्यासाठी कंपनी कसोशीने मेहनत करते आहे. लवकरच एक असे फिचर येणारे आहे ज्यामुळे युजर्सची मैत्री अजून घट्ट होणार आहे.

दोस्ती निभावताना

शरीराच्या जवळ जरी कायम मोबईल असला तरी हृदयाच्या जवळ फक्त मित्रच पोहोचू शकतात. रात्रीचा दिवस करून व्हॉट्सअ‍ॅपवर तासनतास गप्पा मारणाऱ्या यार दोस्तांसाठी हे फिचर येणार आहे. हे फिचर अद्याप मोबाईलवर उपलब्ध नसले तरी लवकरच ते येण्याची शक्यता आहे.

चिन्मयचा चिंटू होणार

जशी जवळकी वाढते तशी मैत्रीची परिभाषा बदलत जाते. आता एकाच व्यक्तीचा नंबर कॉन्टॅक्ट्समध्ये एका नावाने आणि व्हॉट्सअ‍ॅपवर दुसऱ्या नावावे सेव्ह करता येणार आहे. या फिचरची माहिती wabetainfo ने दिली आहे.

(हेही वाचा – Whatsappच्या Spam Callsने त्रासला आहात? आता चिंता नको, लवकरच यावर निघणार उपाय)

चुकीला माफी मिळणार

वैयक्तिक संभाषणासाठी, कार्यालयीन कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. अनेकदा जेवता-जेवता, चालता-चालता केलेल्या मेसेजमध्ये काहीतरी चूक राहून जाते. तेव्हा ती चूक सुधारण्यासाठी मेसेज डिलीट करण्यापासून काही पर्याय नसायचा. मात्र काही दिवसांपूर्वी कंपनीने एक नवीन फिचर लॉन्च केले, ज्याने चूका करणाऱ्यांना कायमचा दिलासा दिला आहे. या नवीन फिचरमुळे पाठवलेला मेसेज एडिट करणे शक्य होणार आहे. मेसेज पाठवल्या पाठवल्या पुढील १५ मिनिटे तो ए़डिट करता येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.