मध्यप्रदेश येथील Pench National Parkला कधी भेट देऊ शकता?

151
मध्यप्रदेश येथील Pench National Parkला कधी भेट देऊ शकता?
मध्यप्रदेश येथील Pench National Parkला कधी भेट देऊ शकता?

पेंच हे घनदाट जंगल आहे. या जंगलात प्रामुख्याने सागवानाची झाडं आढळतात. मध्य प्रदेशातल्या इतर इतर जंगलांच्या तुलनेने पेंचचं नॅशनल पार्क (Pench National Park) जास्त घनदाट आहे त्यामुळे येथे वन्यजीवाचा शोध घेणे जास्त कठीण आहे.

हिवाळ्यामध्ये हे जंगल काही प्रमाणात विरळ झालेलं दिसून येतं. हा हिवाळ्याचा काळ वन्यजीव पाहण्यासाठी अतिशय उत्तम आहे. या काळात तापमान सरासरी १४°C ते ३०°C पर्यंत असतं. सकाळ आणि संध्याकाळ या प्रमाणापेक्षा जास्त गारठवणारी असू शकते. विशेषतः डिसेंबर आणि जानेवारी हे वर्षभरातले सर्वात थंड महिने मानले जातात.

या काळात पेंचच्या नॅशनल पार्कमध्ये (Pench National Park) तुम्हाला रंगीबेरंगी मोर, किंगफिशर्स, इंडियन रोलर्स आणि किरमिजी रंगाच्या बार्बेट्स यांसारख्या २०० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील.

(हेही वाचा – Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेच्या विस्तारामुळे सरकारवर साडेतीन हजार कोटींचा भार)

पेंचच्या नॅशनल पार्कमध्ये वाघ दिसणं कठीण आहे. इथे फिरताना जर तुम्हाला वाघ दिसला तर तुमचं नशीब चांगलं आहे असं समजा.

पेंचच्या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला वाघ पाहायचा असेल तर मार्च ते मे या महिन्यांच्या कालावधीत जायला हवं. कडक उन्हाळा सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत तापमान सहजपणे ४०℃ पर्यंत चढू शकतं.

या कालावधीमध्ये पाणवठ्यावर आपली तहान भागवण्यासाठी येणारे प्राणी इथल्या वाघांची शिकार असतात.

वाघाने शिकार करतानाचं दृश्य कदाचित तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण हे दृश्य पाहण्यासाठी तुमच्यामध्ये ४०℃ एवढं तापमान सहन करण्याची तेवढी सहनशीलता असायला हवी.

(हेही वाचा – Deputy collector ला मिळणार्‍या पागराचा आकडा माहिती आहे का?)

जूनमध्ये इथलं वातावरण थोडं थंड असलं तरी थकवा आणणारं असू शकतं.

मध्य प्रदेशातील पेंच इथलं नॅशनल पार्क (Pench National Park) हे जुलैच्या सुरुवातीपासून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळ्यामुळे बंद ठेवण्यात येतं. ऑक्टोबर महिन्यात ते पुन्हा पर्यटकांसाठी उघडलं जातं. तेव्हा थंडगार हवामानासोबतच पर्यटकांची जास्त गर्दी होण्याआधी या नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी अगदी योग्य वेळ असू शकते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे हिवाळ्याचे महिने पर्यटकांसाठी पीक सिझन मानला जातो. या महिन्यांदरम्यान सर्वांत जास्त पर्यटक या पेंचच्या नॅशनल पार्कला भेट देतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.