World Diabetes Day ची सुरुवात कधी झाली?

223
World Diabetes Day 2023 हा १४ नोव्हेंबर रोजी पाळला जातो. सर फ्रेडरिक बेटिंग यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. सर फ्रेडरिक बेंटिंग यांनीच इन्सुलिन हार्मोनचा शोध लावला होता. चार्ल्स हरबर्टने त्यांना या कामात मदत केली होती. आज जगभरात सुमारे ५० कोटी लोक मधुमहाने ग्रस्त आहेत.

मधुमेह किंवा डायबिटीज म्हणजे काय?

मधुमेह म्हणजे मधु अर्थात शर्करा आणि मेह म्हणजे मूत्र. रक्त शर्करा म्हणजे ग्लुकोज वाढल्यामुळे मूत्रासंबंधी समस्या निर्माण होतात. मधुमेह वाढल्यामुळे अनेक शारिरीक समस्या निर्माण होतात. वैद्यकीयदृष्ट्या अनेक बंधनेही निर्माण होतात.

वर्ल्ड डायबिटीज डे ची सुरुवात कधी झाली?

वर्ल्ड डायबिटीज डे म्हणजेच जागतिक मधुमेह दिनाची सुरुवात सर्वप्रथम इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनने केली. सन १९९१ पासून संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली. डायबिटीजबद्दल जनजागृती निर्माण व्हावी आणि याचा प्रभाव कमी व्हावा यासाठी हा दिवस पाळला जातो.

मधुमेहाचे लक्षण

मधुमेहाचे लक्षण हळूहळू वाढू लागतात. काही लोकांमध्ये तर लक्षणे दिसतही नाहीत. तरी या आजारात काही सामान्य लक्षणांची नोंद करण्यात आली आहे.
तहान लागणे – डायबिटीजच्या रुग्णांना खूप तहान लागते. ते सतत पाणी पीत असतात.
वारंवार लघवी – शरीरात जास्त ग्लुकोज असल्यामुळे मूत्रपिंडाला ते ग्लुकोज शरीराबाहेर फेकायचे असते. म्हणून वारंवार लघवीला होते.
खूप भूक लागणे – मधुमेहामुळे शरीरासाठी ग्लुकोज कामी येत नाही, म्हणून रुग्णांना खूप भूक लागत राहते.
वजन कमी होणे – विशेषतः टाईप १ डायबिटीजमध्ये रुग्णाचे वजन कमी होते. वजन कमी होणे हे मधुमेहाचे अतिशय सामान्य लक्षण आहे.
थकवा – खूपच जास्त प्रमाणात ग्लुकोज असल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे थकवा जाणवत राहतो.
म्हणूनच १४ नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यावसायिकांचे प्रयत्न असे आहे की या रोगाच्या बाबतीत जनजागृती निर्माण करुन जोखमीचे घटक कमी करता यावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.