कोणत्या देशात कीती वापरली जाते सौर आणि पवन ऊर्जा

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. मात्र, कोळशाच्या पुरवठ्यामुळे अनिवार्य कपातीकडे वाटचाल करीत असून विजेचे संकट ओढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती. अनेक राज्यात वीज कपात देखील सुरू झाली आहे. दरम्यान वीजसंकट उभे ठाकले की पर्यायी ऊर्जास्रोतांची चर्चा सुरू होते. सौर आणि पवन ऊर्जेचा आपण सर्वाधिक वापर केला पाहिजे असे मार्गदर्शन देखील होताना दिसते. मात्र, वीजसंकट टळले की पुढील वीजसंकटापर्यंत ही चर्चा तिथेच थांबते. या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात किती सौर आणि पवन ऊर्जा वापरली जाते, हे तुम्हाला माहित आहे का…जाणून घ्या…

(हेही वाचा – तुमचं Facebook हॅक झालं तर काय कराल?)

प्रथमच १० टक्क्यांहून अधिक वीज उत्पादन

चीन, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, अर्जेंटिना, हंगेरी आणि एल साल्वाडोर या सात देशांनी सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून प्रथमच १० टक्क्यांहून अधिक वीज उत्पादनाचा टप्पा गाठला.

सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करणारे देश

 • डेन्मार्क – ५१.९ टक्के
 • लक्झेम्बर्ग – ४३.४ टक्के
 • उरूग्वे – ४६.७ टक्के
 • स्पेन ३२.९ टक्के
 • लिथुआनिया – ३६.९ टक्के
 • पोर्तुगाल – ४१. ५ टक्के
 • जर्मनी – २८.८ टक्के
 • ग्रीस २८.७ टक्के
 • ब्रिटन – २५. २ टक्के

या देशांत कमी वापर

 • भारत – ८ टक्के
 • कॅनडा – ६.६ टक्के
 • सोमालिया – ५.७ टक्के
 • श्रीलंका – २.९ टक्के
 • पाकिस्तान- ४ टक्के

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here