जगातल्या सगळ्याच महागड्या वस्तू या चांगल्या ठिकाणीच मिळतात असं नाही. आता कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो, शिंपल्यात मोती सापडतो, अशी अनेक उदाहरणं देता येतील. आता जगातल्या सगळ्यात महागड्या कॉफीचंच घ्या ना… ही कॉफी चक्क एका प्राण्याच्या विष्ठेतून मिळते.
काय आहे महागड्या कॉफीचं नाव?
चहासोबतच कॉफी हे पेयं सुद्धा जगात भारी आहे. जगात सर्वाधिक प्यायल्या जाणा-या पेयांमध्ये कॉफीचा दुसरा क्रमांक लागतो. मस्त मगमध्ये कॉफी घेऊन त्याचे झुरके मारताना मूड कसा एकदम फ्रेश होऊन जातो. पण जगातली सगळ्यात महागडी कॉफी कुठली आणि ती नेमकी कशी तयार होते? हे जर तुम्हाला कळलं तर तुमचं तोंड वाकडं होऊन, तुमचा मूड स्पॉईल होऊ शकतो. कारण ही कॉफी तयार करण्याची पद्धत जरा विचित्र आहे. कारण ही कॉफी एका प्राण्याच्या विष्ठेतून तयार होते. त्या कॉफीचं नाव आहे कोपी लुवाक…
(हेही वाचाः २४ ऑक्टोबरला भारत-पाक युद्ध! पण कुठे…?)
अशी तयार केली जाते कॉफी
या कॉफीला पू कॉफी असे सुद्धा म्हणतात. इंडोनेशियात सिवेट कॅट या जंगली मांजराची एक प्रजाती आढळते. हे मांजर आपलं खाद्य म्हणून कॉफीच्या शेतातून सर्वात उत्तम कॉफीच्या बिया खातं. पचनक्रियेनंतर कॉफीच्या बिया मांजराच्या विष्ठेतून बाहेर टाकल्या जातात. मांजराच्या शरीरात कॉफीच्या बियांवर होणा-या पचनक्रियेनंतर, या बियांचा स्वाद अधिक वाढतो आणि त्या बिया अधिक टेस्टी होतात, असे सांगितले जाते. मग या बिया स्वच्छ करुन त्या वाळवून त्या भाजल्या जातात. त्यानंतर या बिया बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. भारतात या कॉफीचा दर एका किलोला 20 ते 25 हजार रुपये आहे.
Join Our WhatsApp Community