गर्भधारणेदरम्यान पाय सुजणे ही एक सामान्य स्थिती आहे ज्याला “एडेमा” म्हणून संबोधले जाते. हे शरीराच्या वाढत्या रक्ताचे प्रमाण आणि हार्मोनल बदलांमुळे उद्भवते, ज्यामुळे द्रव धारणा होऊ शकते. वाढत्या गर्भाशयामुळे श्रोणि आणि पाय यांमधील रक्तवाहिन्यांवरही दबाव येतो, ज्यामुळे रक्त परत हृदयापर्यंत पोहोचणे कठीण होते. यामुळे खालच्या अंगात, विशेषतः पाय आणि घोट्यात द्रव साचू शकतो.
गर्भधारणेदरम्यान (Pregnancy)पायाची सूज कमी करण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिपा आम्ही देत आहोत. बेंगळुरू येथील व्हाईटफिल्डमधील मदरहूड हॉस्पिटल्समधील सल्लागार ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट, डॉ. निर्मला एम. यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
हायड्रेटेड राहा
गरोदर महिलांनी दिवसभर भरपूर पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला अतिरिक्त द्रवपदार्थ सोडण्यास प्रोत्साहित करून शरीर डिहायड्रेट होण्याचा त्रास होत नाही. गरोदरपणात (Pregnancy) आपल्या बाळाचीही काळजी असते. त्यामुळे शरीराला व्यवस्थित पाणी मिळत राहिले तर पायाला अधिक प्रमाणात सूज येत नाही.
तुमचे पाय वरच्या बाजूला ठेवा
जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमचे पाय उंच केल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास आणि सूज कमी करण्यास मदत होते. दिवसातून तुम्ही ५-६ वेळा तुमचे पाय 15-20 मिनिटे पायाखाली उशी घेऊन त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे पायाची सूज कमी होण्यास मदत मिळते.
(हेही वाचा Chandrayan- 3 : चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेल आणि अंतराळ मोहिमांचा एक नवा इतिहास घडवेल)
आरामदायी शूज घाला
पुरेसा किमान सपोर्ट देणारे आश्वासक आणि आरामदायी पादत्राणे निवडा. उंच टाच किंवा खूप घट्ट असलेले शूज टाळा. गरोदरपणात चप्पल व्यवस्थित घालणे आवश्यक असते. पायाला अधिक प्रमाणात सूज आलेली असते. अशा वेळी तुम्ही आरामदायी शूज वापरणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कॉम्प्रेशन सॉक्स किंवा स्टॉकिंग्जचा वापर करा. ग्रॅज्युएटेड कॉम्प्रेशन सॉक्स किंवा स्टॉकिंग्ज रक्ताभिसरण सुधारण्यास आणि पाय आणि पायांची सूज कमी करण्यास मदत करू शकतात.
नियमित व्यायाम करा
चालणे किंवा पोहणे यासारखे हलके व्यायाम रक्ताभिसरण सुधारण्यास आणि जास्त प्रमाणात द्रव जमा होण्यास मदत करू शकतात. तसंच पायाला सूज येऊ नये आणि बाळ व्यवस्थित राहावे यासाठी तुम्ही शारीरिक हालचाली करणे गरजेचे आहे. तुम्ही नियमित व्यायाम करा आणि पायाची सूज कमी करता येईल याकडे लक्ष द्या.
हेल्दी डाएट
सोडियमचे प्रमाण कमी असणारे पदार्थ आणि फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य असलेले आहार तसंच द्रवपदार्थ पायाची सूज कमी करण्यात मदत करू शकते. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करणे गरोदरपणामध्ये टाळा. सोडियमयुक्त पदार्थ अति खाऊ नका.
मालिश आणि कूल कॉम्प्रेस
हलक्या हाताने पायाचे आणि घोट्याचे मालिश करा जेणेकरून रक्ताभिसरण सुधारण्यास आणि सूज कमी करण्यात मदत करू शकते. याशिवाय तुम्ही पायाला सौम्य मॉइश्चरायझर किंवा तेल वापरा. तसंच कूल कंप्रेसेसचा उपयोग करून घ्या. अशावेळी तुमच्या पायांना थंड कंप्रेसेस लावल्याने सूज येण्यापासून तात्पुरता आराम मिळू शकतो.
घट्ट कपडे घालणे टाळा
घट्ट कपडे, विशेषत: तुमच्या घोट्याच्या आणि अंगाभोवती असणारे घट्ट कपडे हे रक्त प्रवाह प्रतिबंधित करू शकतात आणि सूज वाढवू शकतात. त्यामुळे याचा वापर करणे टाळा. तसंच रक्तदाबाचे निरीक्षण करा. काही वेळा सूज येणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते (प्रीक्लेम्पसिया), त्यामुळे नियमितपणे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करणे आणि तुमच्या प्रसूतीपूर्व तपासणीस उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, डोकेदुखी किंवा दृष्टीतील बदल यासारख्या इतर लक्षणांसह गंभीर किंवा अचानक सूज दिसली, तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधणे आवश्यक आहे, कारण ही प्रीक्लॅम्पसियासारख्या अधिक गंभीर स्थितीची चिन्हे असू शकतात. लक्षात ठेवा की प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते आणि जर तुम्हाला पाय सुजलेल्या किंवा इतर कोणत्याही लक्षणांबद्दल चिंता असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिफारसींसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
Join Our WhatsApp Community