Why is Naneghat famous? : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला “नाणेघाट” का आहे इतका प्रसिद्ध?

114
Why is Naneghat famous? : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला "नाणेघाट" का आहे इतका प्रसिद्ध?

नाणेघाट हा कोकण ते जुन्नर दरम्यान असलेला एक २००० वर्षं जुना व्यापारी मार्ग आहे. दख्खन पठाराच्या सीमेवर वसलेल्या कोकणामधून येणाऱ्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे इथला प्रसिद्ध धबधबा त्याच्या उतरणी ऐवजी पुन्हा आकाशाच्या दिशेने धाव घेतो. त्यामुळे हा धबधबा उलट वाहत असल्यासारखा वाटतो. हा धबधबा रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहे. (Why is Naneghat famous?)

नाणेघाट येथे ट्रेक करणं नवशिक्यांसाठी कठीण आहे का?

नाणेघाट इथला रिव्हर्स वॉटरफॉल ट्रेक हा एक सोपा ट्रेक आहे. पण कोकण किंवा मुंबईच्या बाजूने बऱ्यापैकी लांब आहे. इथे पोहोचण्यासाठी एका बाजूचं अंतर सुमारे ८ किलोमीटर एवढं आहे. तरी पुण्याच्या बाजूने एक थेट रस्ता आहे. या रस्त्याने तुम्ही थेट ड्राईव्ह करून इथे पोहोचू शकता. पण जर का तुम्ही हे अंतर ट्रेक करून कापलं, तर तुम्हाला एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग पाहायला मिळेल. तसंच इथवर ट्रेक करताना रिव्हर्स वॉटरफॉल अधिक आकर्षक दिसेल. (Why is Naneghat famous?)

नाणेघाटचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो?

मुंबईकडून माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे ३ तास लागतात. त्यापुढे पुण्याकडून थेट रस्त्याने पोहोचता येतं.

नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉल ट्रेकसाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

जर तुम्हाला फक्त रिव्हर्स वॉटरफॉल पाहायचा असेल तर तुम्ही फक्त पावसाळ्यातच नाणेघाट ट्रेकची योजना आखायला हवी. या ट्रेलमध्ये दगडी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात या पायऱ्यांवर पाणी साचलेलं असतं. त्यामुळे इथे चालताना खूप आरामदायी अनुभव मिळतो.

पण जर का तुम्हाला नाणेघाट इथल्या व्यापारी मार्गाचाही आनंद घ्यायचा असेल तर, तुम्ही लवकर ट्रेक सुरू केला तर हिवाळा आणि पावसाळा हा उत्तम काळ आहे. कारण जंगलात चढाई करताना उन्हाळ्यात अजिबात गारवा नसतो आणि खूप उष्णता आणि थकवणारा अनुभव येतो. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यानचा काळ हा इथे ट्रेकिंग करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. (Why is Naneghat famous?)

(हेही वाचा – sugarcane juice benefits in pregnancy : उसाच्या रसात असतात अनेक पोषक घटक; गरोदरपणातही मिळतात आश्चर्यकारक फायदे)

नाणेघाटचा इतिहास

नाणेघाट हा सोपारा, कल्याण आणि ठाणे या जुन्या सागरी बंदरांना जुन्नरमधल्या आर्थिक केंद्रांशी जोडणारा एक प्राचीन व्यापारी मार्ग आहे. हा मार्ग सुमारे २००० वर्षांपूर्वी सातवाहनांच्या काळात बांधला गेला. त्यावेळी कल्याण हे मोठं व्यापारी केंद्र होतं. जुन्नर हे सातवाहन, चालुक्य, शिलाहार इत्यादी अनेक राजवंशांची राजधानी असल्यामुळे हा व्यापारी मार्ग भरभराटीला आला.

या मार्गाचं संरक्षण करण्यासाठी त्याकाळी जीवधन, निमगिरी (हनुमंतगड), हडसर, चावंड आणि शिवनेरी असे किल्ले बांधण्यात आले होते. या व्यापारी मार्गाला सर्वात जुना टोल बूथ देखील म्हटलं जाऊ शकतं. इथे नाणेघाटाच्या माथ्यावर नाणे गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारं एक मोठं भांडं म्हणजेच रांजण आहे. यामुळेच या ठिकाणाचं नाव “नाणे” म्हणजे नाणे आणि “घाट” म्हणजे खिंड, म्हणजेच नाणेघाट असं पडलं असावं. (Why is Naneghat famous?)

वैशाखरे नावाच्या गावाजवळ अशीच भांडी सापडली होती. ही भांडी या व्यापारी मार्गाचा प्रारंभिक भाग होती. घाटाच्या वरच्या बाजूला असलेली गुहा सातवाहनांच्या राजवटीत बांधली होती. या गुहेमध्ये सातवाहन राजवंशातल्या प्रमुख सदस्यांच्या ८ मूर्ती होत्या. पण परकीय आक्रमणामुळे त्या मूर्ती नष्ट झाल्या. गुहेमध्ये राणी नागनिका यांनी दिलेल्या यज्ञ आणि देणग्यांचे वर्णन करणारे ब्राह्मी आणि देवनागरी भाषेतले शिलालेख भिंतींवर कोरलेले आहेत.

(हेही वाचा – Places of Worship Act 1991 वरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली)

नाणेघाट ट्रेक करण्यासाठी तुम्ही कुठे राहू शकता?

नाणेघाट ट्रेक हा एक दिवसाचा ट्रेक आहे. पण जर तुम्ही नाणेघाट पठाराच्या जवळ वरच्या बाजूला असलेल्या जीवधन किल्ल्यावर जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल जवळ असलेल्या एखाद्या होम स्टे मध्ये राहू शकता. ट्रेकच्या सुरुवातीलाच तुम्हाला जेवायचं असेल तर इथे जेवण उपलब्ध असतं. त्यानंतर थेट नाणेघाटच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर जेवण मिळतं. ट्रेकिंगच्या मार्गावर काही तात्पुरते खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. पण ते पावसाळ्याच्या शेवटी असतात. अशा अनेक कारणामुळे नाणेघाट प्रसिद्ध आहे.

मुंबई आणि पुण्याहून नाणेघाटला कसं पोहोचायचं?

नाणेघाट हा जुन्नर आणि कल्याणला जोडणारा एक पर्वतीय खिंडीचा मार्ग आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरजवळ आहे. नाणेघाट हे पुणे शहरापासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून सुमारे १६५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कल्याण हे नाणेघाटच्या सर्वात जवळचं मोठं रेल्वे स्थानक आहे. (Why is Naneghat famous?)

मुंबईहून नाणेघाट इथे पोहोचण्यासाठी वैशाखरे नावाचं पायथ्याशी असलेलं गाव आहे. हे गाव कल्याणपासून ९० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हे गाव महामार्गापासून थोडं दूर आहे. वैशाखरेहून थोडे जास्त चालत जाऊन नाणेघाट ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी, तुम्ही माळशेज घाट बसने चढू शकता आणि टोकावडे नावाच्या गावापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरुवातीच्या ठिकाणी थेट उतरू शकता.

(हेही वाचा – ज्ञानेश कुमार देशाचे नवे Chief Election Commissioner; १९ फेब्रुवारीला स्वीकारणार पदभार)

इथे पोहोचण्यासाठी सर्वात आधी कल्याण रेल्वे स्थानकावर जावं लागेल. त्यानंतर जवळच्या बस स्थानकावरून माळशेज घाटमार्गे अलेफाटाकडे जाणारी कोणतीही बस पकडून ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी किंवा टोकावडे गावात तुम्ही उतरू शकता. टोकावडे गावात उतरल्यावर शेअरिंग वाहनाने सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचता येतं. पण जर तुमच्याकडे खाजगी वाहन असेल तर गुगल मॅप्सवर नाणेघाट ट्रेकचा प्रारंभ बिंदू शोधून थेट प्रवास करा. (Why is Naneghat famous?)

पुण्याहून नाणेघाट इथे पोहोचण्यासाठी अलेफाटा इथे जाणारी कोणतीही बस पकडू शकता. नंतर माळशेज घाटमार्गे कल्याणला जाणारी दुसरी बस पकडून टोकावडे गावात उतरू शकता. तुम्हाला गावापासून ५ किलोमीटर आधी असलेल्या सुरुवातीच्या ठिकाणी उतरावं लागेल. याव्यतिरिक्त खाजगी वाहनाने तुम्ही तुमच्या गुगल मॅप्समध्ये फक्त स्थान जोडून थेट नाणेघाटच्या माथ्यावर जाऊ शकता. पण जर का, तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा असेल तर जुन्नरला जाण्यासाठी कोणतीही बस पकडा आणि घाटघर गावाला जाण्यासाठी दुसरी बस घ्या. ती बस तुम्हाला नाणेघाटाजवळ सोडेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.