सिम कार्डची एक बाजू कट केलेली का असते? जाणून घ्या…

96

अलिकडे प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. इंटरनेट, कॉलिंग अशा विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड असणे आवश्यक असते. सिम कार्डशिवाय तुम्ही स्मार्टफोनवरून कोणाला कॉलही करू शकत नाही. देशातील काही प्रमुख टेलिकॉम कंपन्या उदाहरणार्थ एअरटेल, जिओ, वीआय या युजर्सला सेवा प्रदान करतात. तुम्ही सुद्धा स्मार्टफोनमध्ये अनेकवेळा सिम कार्ड इन्सर्ट केले असेल पण, या सिम कार्डचा अर्धा भाग कापलेला का असतो? याचा तुम्ही विचार केला आहे का याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : उन्हाळ्यात थंड पाण्याचे सेवन करताय?… तर सावधान! )

सिम कार्डच्या डिझाइनमध्ये बदल

प्रारंभीच्या काळात जेव्हा सिम कार्डचा उपयोग करण्यास सुरूवात झाली तेव्हा सिम कार्डचे डिझाइन अत्यंत साधे होते. या कार्डला कोणत्याही प्रकारचा कट नव्हता. परंतु या साध्या, सरळ डिझाइनमुळे युजर्सला सिम कार्ड इन्सर्ट करताना, पुन्हा काढताना अनेक अडचणी येऊ लागल्या. तसेच या सिमचा कोणती बाजू सरळ, कोणती उलट हे जाणून घेताना सुद्धा युजर्सचा गोंधळ उडत असे यामुळे सिम कार्डच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले.

ई-सिम नवा पर्याय

युजर्सला सोयीस्कररित्या सिम कार्ड इन्सर्ट करता यावे याकरता या सिम कार्डला टेलिकॉम कंपन्यांनी एका बाजूला कट दिले आहेत. यामुळे सिम कार्डचा एक कोपरा कापलेला आपल्याला दिसतो. या कट मुळे सिम कार्ड काढणे-घालणे अगदीच सोपे झाले. सिम कार्डची कोणती बाजू सरळ हे सुद्धा ओळखण्यास सोपे जावे म्हणून अलिकडच्या स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड इन्सर्ट करण्यासाठी ट्रे देण्यात आले आहेत. या सिम कार्ड ट्रे मध्ये कोपरा कापलेले डिझाइन केलेले असते.

अनेक लोक एकावेळी दोन ते तीन मोबाइल क्रमांक युज करतात यामुळे आता ई-सिम हा पर्याय उपलब्ध झालेला आहे. यामुळे स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड इन्सर्ट करायची समस्याच संपणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.