रस्त्याने जाताना आपण अनेक गाड्या बघतो. शाळेच्या बसचा रंग पिवळाचं का असतो. मुलांना त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाटी आणि परत घरी सोडण्यासाठी स्कूल व्हॅन/बसचा वापर केला जातो. परंतु या स्कूल बसला ठराविक रंग का दिला जातो हे फार कमी जणांना माहित आहे. विशेष म्हणजे स्कूल बसला ठराविक रंग देण्यामागे विशेष कारण आहे.
( हेही वाचा : फक्त १ रुपयांत करा BEST प्रवास )
स्कूल बससाठी विविध प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत यानुसार स्कूल बसला पिवळा रंग देणे बंधनकारक समजले जाते. परंतु यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत जी मुलांच्या सुरक्षेशी संबंधित आहेत…
स्कूल बस पिवळ्या रंगाच्या का असतात?
पिवळा हा रंग आपल्याला दूरवरून सुद्धा दिसू शकतो. संध्याकाळची वेळ असो किंवा पहाटेचा मंद प्रकाश, धुक्यासारख्या परिस्थितीत पिवळा रंग लगेच दिसतो. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते. त्यामुळे लांबून जरी एखादी स्कूल व्हॅन येत असेल तर लगेच आपल्याला लक्षात येते तसेत अपघाताची शक्यताही कमी होते.
१९३० मध्ये अमेरिकेत एका संशोधनात आढळले होते की, पिवळा रंग आपल्या डोळ्यांना सर्वात आधी दिसतो पिवळा रंग इतरांपेक्षा १.२४ पट जास्त आकर्षित आहे. यामुळेत स्कूलबस रंगविण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.
Join Our WhatsApp Community