सावधान! ‘या’ कारणामुळे मोबाईल होऊ शकतो ब्लास्ट

193

आपण बर्‍याचदा बातम्यांमध्ये वाचतो आणि पाहतो की मोबाईल फोनचा ब्लास्ट झाला. कहई लोक म्हणतात की ही बातमी खोटी आहे. मोबाईल कसा ब्लास्ट होऊ शकतो. मात्र आपल्या निष्काळजीपणामुळे असा घटना घडू शकतात. त्यामुळे मोबाईल वापरताना सावधगिरी पाळली पाहिजे.

बॅटरी अधिक प्रमाणात गरज झाली तर मोबाईल ब्लास्ट होऊ शकतो. मोबाईल शॉर्ट सर्किट झाल्याने देखील ब्लास्ट होऊ शकतो. लक्षात असू द्या चार्जिंग करताना रेडिएशन खूप असतं. यामुळे बॅटरी गरम होते. त्यामुळे चार्जिंग सुरु असताना कधीही फोनवर बोलू नये आणि फोन वापरु सुद्धा नये.

(हेही वाचा जेव्हा महापालिका निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेत असणारच; राज ठाकरेंचा विश्वास)

चार्जिंग सुरु असताना फोनचा वापर केल्या बॅटरी खूप गरम होते त्यामुळे दुर्घटना होऊ शकते. काही स्मार्टफोन कंपन्या हाय एंड प्रोसेसरवर हीट सिंक लावतात. हीट सिंकमुळे उष्णता  कमी होते. जर मोबाईलमध्ये हीट सिंक नसेल तर प्रोसेसर गरम होऊन फोन ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन विकत घेताना याची काळजी जरुर घ्यावी.

हार्डवेअरमध्ये खराबी आली असेल तरी देखील ब्लास्ट होऊ शकतो. म्हणून फोन खराब झाला तर लगेच दुरुस्त केला पाहिजे. बॅटरी फुगली तर लगेच बदलली पाहिजे. चार्ज करण्यासाठी ड्युप्लिकेट चार्जरचा कधीही वापर करु नये. मोबाईलमध्ये जास्त प्रमाणात ऍप्स इन्स्टॉल करु नका. जास्त ऍप्स असले तरी मोबाईल वर भार येतो आणि ब्लास्ट यासरखी दुर्दैवी घटना घडू शकते. मोबाईल वापरताना इतकी काळजी तर नक्कीच घ्यायला हवी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.