डोना पॉला हे भारतामध्ये असलेल्या गोवा राज्यातलं पणजी येथे असलेलं एक अतिपरिचित पर्यटन स्थळ आहे. हे स्थळ सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचं गोव्यातलं इंटरनॅशनल सेंटर आहे. (Dona Paula Beach Goa)
डोना पॉलाचा इतिहास
पोर्तुगीज काळात भारतात असलेल्या डोना पॉला अमरल अँटोनिया डी सौटो मायोर हिच्या नावावरून या ठिकाणाचं नाव ठेवलं गेलं आहे. ती श्रीलंकेतील जाफनापट्टणमच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयशी संबंधित होती. ती आणि तिचे कुटुंब १७४४ साली गोव्यात आलं. तिने १७५६ साली स्पेनमधल्या एका हिडाल्गोशी लग्न केलं. तिच्या वडिलांचं नाव डोम अँटोनियो केटानो डी मेनेझेस सौतो मायोर असं होतं. त्यांचं कुटुंब एक अत्यंत श्रीमंत कुटुंब होतं. सध्याच्या काबो राज निवासापासून ते कॅरनझालेमपर्यंतची संपूर्ण मालमत्ता सौतो मायोर या कुटुंबाची होती. २१ डिसेंबर १७८२ साली तिचा मृत्यू झाला.
डोना पॉला ही एक दानशूर महिला होती असं म्हटलं जातं. तिने गावकऱ्यांना मदत केली होती आणि त्यांच्या भल्यासाठी खूप काम केलं होतं. म्हणून तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी या ठिकाणाचं नाव तिच्या नावावरूनच ‘डोना पॉला’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या परिसराला ‘ओडावेल’ असं म्हटलं जात होतं.
पॅलासिओ डो काबो म्हणजेच सध्याचं गोवा राजभवन हे डोना पॉला इथल्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे. हे क्षेत्र ब्रिटीश स्मशानभूमीचं स्थान देखील आहे.
(हेही वाचा – UN मधील पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणाचा भारताने घेतला खरपूस समाचार; म्हटले…)
डोना पॉला इथलं पर्यटन
डोना पॉला हे गोव्यातल्या पणजी येथे मिरामार पासून पसरलेल्या समुद्रकिनारपट्टीवर वसलेलं आहे. डोना पॉला या ठिकाणी वारंवार पर्यटक येत असतात. पर्यटनाच्या पीक सीझनमध्ये डोना पॉला हे गर्दीच्या भागात रूपांतरित होते. पण हे ठिकाण पावसाळ्यात अतिशय शांत असतं. (Dona Paula Beach Goa)
‘एक दुजे के लिए’ या हिंदी चित्रपटाचा एक मोठा भाग या ठिकाणी शूट करण्यात आला होता. त्यामुळे हे ठिकाण आणखीच लोकप्रिय झालं. तसंच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ या चित्रपटातील ॲक्शन सीनचे शूटिंगही इथेच झालं.
या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर मांडोवी आणि झुआरी या नद्या ज्या ठिकाणी वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात. ते ठिकाण रमणीय आणि खडकाळ आहे. हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे.
डोना पॉला इथल्या आकर्षणांपैकी एक म्हणजे फेरी जेट्टीजवळच्या खडकांवर उभा असलेला पांढरा शुभ्र पुतळा होय. गोवा पर्यटन मंडळाच्या वेबसाइटवर या पुतळ्याला “इमेज ऑफ इंडिया” असं नाव देण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community