Bhagavad gita : ‘या’ एका गोष्टीमुळे माणसाला सतत राग येतो; श्रीमद् भगवतगीतेत सांगितलेले उत्तर वाचा…

206

श्रीमद् भगवतगीता हा हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ मानला जातो. धर्माच्या पलीकडे सुद्धा मानवता मानणाऱ्या अनेकांना गीतेचे श्लोक मार्गदर्शन करतात. श्रीमद् भगवतगीतेत तब्बल १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत ज्यातुन श्रीकृष्णाने अर्जुनासह पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला संदेश दिल्याचे मानले जाते. आत्मा, परमात्मा, भक्ती यांचा बोध देत कर्म व आयुष्यातील प्रत्येक टप्यावर येणाऱ्या अनेक द्विधा स्थितीत लढण्याचे बळ गीतेमध्ये दडलेले आहे. आपल्याच प्रियजनांविरुद्ध युद्ध लढण्यास जेव्हा अर्जुन संभ्रमित होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यानंतर अर्जुनाने गांडीव उचलून युद्ध केले. हा प्रसंग आजही प्रत्येकजण कधी ना कधी आयुष्यात अनुभवतोच. प्रियजनच नव्हे तर कित्येकदा स्वतःचेच विचार, विश्वास, सवयी यांच्याविरुद्ध युद्ध करण्याची वेळ आपल्यावर येते, अशा स्थितीत काय केल्याने आपण आपले व आपल्या हितचिंतकांचे रक्षण करू शकता हे आज आपण गीतेच्या श्लोकातून समजून घेणार आहोत.

श्रीमद् भगवतगीतेमध्ये दुसऱ्या अध्यायातील ६२वा श्लोक आपल्याला आपल्या सवयी बदलण्याचे कारण पटवून देतो. मानवाच्या क्रोधाला कारणीभूत ठरणारी एक सवय म्हणजे ‘विषयासक्ती’ जिच्यामुळे अनेकदा आपण उत्तम संधी, चांगली माणसं गमावून बसतो.

(हेही वाचा I.N.D.I.A आघाडीपासून AAP फारकत घेणार?  )

श्रीमद् भगवतगीतातील श्लोकाचा अर्थ

वस्तू, व्यक्ती किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा मोह हा आपल्या क्रोधाचे कारण ठरत असतो. हा मोह जेव्हा पूर्णत्वास नेता येत नाही तेव्हा त्यातून संताप वाढू लागतो. मोहाचे रूपांतर कामनेत होते व कामना पूर्ण न झाल्यास स्मृती भ्रष्ट होऊ शकते. भ्रष्ट स्मृतीने केलेल्या कामात यश मिळत नाही आणि तिथून अधोगती सुरु होते. अशावेळी मोह आवरणे हे अत्यंत आवश्यक असते.

हीच बाब आपण नेहमीच्या आयुष्यातही अनुभवली असेल. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीशी मनापासून जोडले जातो तेव्हा त्यातील छोटासा बिघाड किंवा त्रास सुद्धा आपल्याला मोठा वाटतो. खरंतर ती गोष्ट सुधारण्याची शक्यता असली तरी दुःखात आपण त्या बदलांकडे लक्षच देत नाही. त्यामुळे काम करताना मन, इच्छा मोह यासह बुद्धीचा ताळमेळ राखणे सुद्धा आवश्यक असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.