आपल्या चुकांमुळे आपलं खूप मोठं नुकसान होणार असलं तरी माणूस त्या चुका करतच राहतो. बर्याचदा काही काळासाठी माणसाला आपल्या चुकांची जाणीव होते, मात्र पुन्हा तो त्या चुका करायला मोकळा होतो. असं का होतं? प्रिसिडिंग्स ऑफ दि नॅशनल ऍकेडेमी ऑफ सायंसेजमध्ये एक शोध अहवाल छापून आला आहे.
हा शोध अहवाल ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटी आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीचा असून या अहवालानुसार सारख्या सारख्या चुका करणार्या लोकांमध्ये बदलण्याची इच्छा कमी असते. अशा लोकांना आपल्या चुकांचं खरं कारण कळत नाही. म्हणून ते एकच चूक सारखी सारखी करत राहतात.
संशोधकांनी काही तरुणांना एक व्हिडिओ गेम खेळायला दिला. हा गेम ब्रह्मांडाच्या विविध मायावी ग्रहांवर आधारित होता. यापैकी या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना कोणत्याही दोन ग्रहांवर क्लिक करायला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांना गुण मिळत होते. तसेच त्या आधारावर त्यांना पैसे मिळत होते.
(हेही वाचा – Blood Pressure : सतत फोनवर बोलता? जरा दमानं! होईल रक्तदाबाचा त्रास)
संशोधकांनी हे सांगितलं नव्हतं की, जेव्हा जेव्हा ते कोणत्याही ग्रहावर क्लिक करतील तेव्हा अंतरिक्ष यान येईल आणि त्यांचे गुण चोरुन नेतील. दुसर्या ग्रहांवर क्लिक केल्याने अशा प्रकारचं नुकसान होणार नाही. काही लोकांना अंतरिक्ष यानबद्दल कळलं तर काही लोकांना कळलं नाही. ज्या लोकांना कळलं ते लोक सजग झाले आणि आपल्या खेळात त्यांनी बदल केला. अशा लोकांना संशोधकांनी ’सेंस्टिव्ह’ असं नाव दिलं.
आणि जे लोक चांगलं खेळले नाही अशा लोकांना “कंपल्सिव्ह” असं नाव देण्यात आलं. कारण त्यांना गुण चोरायला येणार्या यानाबद्दल सांगितल्यानंतरही ते त्याच ग्रहावर क्लिक करत राहिले. त्यांच्यात बदल करण्याची इच्छा नव्हती. बिहेव्हियरल न्यूरोसायंटिस्ट प्रोफेसर गॅवन मॅकनॅली यांनी सांगितलं की, खर्या आयुष्यात लोक अधिक लवचिक असतात. मात्र व्यसन आणि जुगार या दोन सवयी सोडण्याबाबत काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या सवयी इतर कामांपेक्षा अधिक महत्वाच्या आहेत असं काही लोकांना वाटतं. म्हणूनच काही लोक त्याच त्याच चुका करत राहतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community