अकाली वृद्धत्व येण्यामागील काय आहेत कारणे?

130

30 ते 40 वयोगटातील लोक खूप उत्साहीत असतात. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे 50-60 वयात दिसणारी लक्षण 40-45 या वयातच  जाणवू लागतात. केस लवकर पांढरे होणे, थकवा जाणवणे, पचन तंत्रातील बिघाड, दृष्टी कमी होणे, दात कमकुवत होणे, इत्यादी लक्षणे लोकांमध्य लवकर दिसू लागतात. तुम्हालाही असा त्रास होत आहे का ? तुमची चाल मंदावली आहे का ? वयाच्या चाळीशीतच म्हातारपण येऊ लागले आहे का ? तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत आहेत का ? जर याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला वेळेवरच सावध  होऊन जीवनशैलीत काही बदल करण्याची गरज आहे. ही लक्षणे वेळीच ओळखून त्यानुसार बदल केल्यास, काही उपाय केल्यास तुम्ही तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह व्हाल.

चालण्याची गती मंदावणे- जर चाळीशीतच तुमचा चालण्याचा वेग मंदावला असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा. ही परिस्थिती सुधारण्यासाठी एका मिनिटांत 100 पावलं चालण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला आरामदायक वाटतील अशा चपला किंवा बूट घालू शकता. तसेच मित्रांचीही मदत घेऊ शकता.

सन स्पॉट्स – कडक उन्हामुळे तुमचा चेहरा, हात किंवा पाय यावर काळ्या अथवा चॉकलेटी रंगाचे डाग आले आहेत का ? 50 वयोगटातील लोकांच्या बाबतीत असे होणे कॉमन आहे. मात्र यापैकी काही लक्षणे आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्या डागांचा रंग खूप गडद असेल किंवा त्यांचा आकार बदलत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवा. तसेच बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा, त्यामुळे तुमचे उन्हामुळे संरक्षण होईल. सकाळी 10 ते 2 या वेळेत खूप कडक ऊन असते, तेव्हा शक्यतो या वेळेत बाहेर पडणे टाळावे.

स्मरणशक्ती कमी होणे – आजकाल चाळीशीही लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होतो. बऱ्याच वेळा लोकांना एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा पत्ता लक्षात ठेवणे कठीण जाते किंवा ते आठवायला खूप वेळ लागतो. तुम्हाला चांगली स्मरणशक्ती हवी असेल तर पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच व्यायामही करावा. जास्तीत जास्त वेळ लोकांसोबत घालवावा.

सांधेदुखीचा त्रास – 55 ते 60 या वयोगटातील लोकांनाच सांधेदुखीचा त्रास व्हावा हे काही गरजेचे नाही. आजकाल ही लक्षणे 45 वर्षांच्या पुरूषांमध्येही दिसू शकतात. या समस्येपासून हळू-हळू मुक्ती मिळू शकते. त्यासाठी आठवड्यातून 1 तास तरी व्यायाम करावा. तसेच लवचिकता, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि ॲरोबिक्स केल्यानेही सांधेदुखी कमी होऊ शकते. त्याशिवाय तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

कोरडी त्वचा – जसजसे वय वाढत जाते तसतसा त्वचेतील ओलावा कमी होऊ लागतो व त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. तुम्हाला ही लक्षणे वयाच्या चाळीशीतच दिसू लागली तर सावध व्हा आणि या गोष्टींची काळजी घ्या.

  •  गरम पाण्याने स्नान करू नये.
  • तुमची त्वचा नीट, हळूवारपणे स्वच्छ करावी आणि वेळोवळी मॉयश्चरायजरचा वापर करावा.
  • आहारात द्रव पदार्थांचा वापर वाढवा.
  • कोरड्या , शुष्क हवेत बाहेर जाणे टाळा.

हातांची पकड कमकुवत होणे – साधारणत: पन्नाशीनंतर आपली पकड कमकुवत होऊ लागते. मात्र 45 वर्षांनंतरच असा त्रास होऊ लागला तर त्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. हाताची पकड मजबूत करण्यासाठी स्ट्रेस बॉल किंवा क्ले ची मदत घेऊ शकता. तसेच वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्यावे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.