नुकताच एआयद्वारे निर्माण केलेला प्रभू श्रीरामांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो काही जणांना आवडला तर काही जणांना खटकला. यावरुन एक गोष्ट समोर आली ती म्हणजे पुढचा काळ या आर्टिफिशल इंटलिजेन्सचा असणार आहे. जगावर तंत्रज्ञानाची पकड मजबूत होणार आहे.
( हेही वाचा : अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेत्याची पुणे पोलिसात तक्रार)
एआय – आर्टिफिशल इंटलिजेन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांची जागा घेईल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. हल्लीच ब्रिटन आणि जपानमधील ६५ एआय तज्जांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यावर एक अहवालही तयार करण्यात आला आहे. त्यात असं म्हटलं गेलंय की या दशकाच्या अखेरीस दुकानात माणसांची गरज भासणार नाही. म्हणजे दुकान अथवा मॉलच्या सुरक्षेसाठी तसेच काऊंटर, बिलिंगपासून स्वच्छतेसाठी देखील माणसाऐवजी रोबोट कामाला येणार आहे.
दुकानांसह घरातली कामे देखील ऑटोमेशनवर होतील. झाडू मारण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत सुमारे ३९% कामे रोबोट करु शकतो. मुलांचा सांभाळ करण्याचे फीचर्स देखील या रोबोट समाविष्ट केले जाऊ शकतात. परंतु प्रा. हरटॉग ज्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एआय आणि सोसायटीच्या प्रोफेसर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की स्मार्ट तंत्रज्ञानामुळे गोपनीयतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. आपली गोपनीयता धोक्यात येऊ शकते.
या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपला वेळ नक्कीच वाचणार आहे, परंतु त्याचे दुश्परिणाम देखील आहेत. प्रा. हरटॉग यांचे म्हणणे असेही आहे की यामुळे स्त्री-पुरुष समानता वाढेल. क्रोएशिया या देशात तर रोबोट जेवण बनवतात. आता जगभरात या तंत्रज्ञानाची मानवी वाढू लागली आहे. पण मुद्दा हा आहे की या तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य माणसांच्या पोटावर पाय तर ठेवला जाणार नाही ना?
Join Our WhatsApp Community