जर तुम्हाला देखील हिवाळ्यात होणाऱ्या प्रदूषणाची चिंता असेल, त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होत आहे, तर काही घरगुती उपाय करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला दह्यापासून बनवलेला असा फेसपॅक (Facepack) कसा बनवायचा, ते सांगणार आहोत. (Winter Skin Care)
(हेही वाचा – Gujarat Surya Namaskar : गुजरातने वर्षाच्या पहिल्या दिनी केला विश्वविक्रम; पंतप्रधानांनी केले ‘हे’ आवाहन)
हिवाळा (winter) असो किंवा उन्हाळा (Summer), प्रत्येक हंगामात आपली त्वचा उजळावी, अशी आपली इच्छा असते. आपण विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. रासायनिक उत्पादनांचा वापर केल्याने आपल्याला काही काळासाठी फायदा होऊ शकतो; परंतु त्याच वेळी ते आपल्या त्वचेवरही परिणाम करतात. आपली त्वचा खूप नाजूक असते, म्हणून आज आम्ही तुम्हाला एक घरगुती फेसपॅक कसा बनवायचा, ते सांगणार आहोत.
फक्त 2 चमचे दही (curd) आणि 1/2 चमचा हळद (Turmeric)
– एक लहान वाटी घ्या आणि दही-हळद एकत्र मिसळा.
– हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा.
– ते कमीतकमी 10 मिनिटे कोरडे होऊ द्या.
– यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
– कोमट पाण्याने चेहरा धुवा.
– तुम्ही हा घरगुती उपाय आठवड्यातून 2 ते 3 दिवस करून पाहू शकता.
(हेही वाचा – New Year 2024 : २०२३ सरले; २०२४ मध्ये काय काय घडणार ?)
दही आणि हळदीचे फायदे
हिवाळ्यात वाढत्या प्रदूषणामुळे (pollution) आपल्या सर्वांच्या त्वचेचे नुकसान होत आहे. या परिस्थितीत प्रदूषणामुळे चेहऱ्याचे नुकसानही कमी व्हावे आणि चेहऱ्यालाही चमक मिळावी, अशी सर्वांची इच्छा असते. त्यामुळे हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावणे महत्वाचे आहे. त्यात असलेली हळद तुमच्या चेहऱ्यावरील जंतू आणि धूळ साफ करेल. चेहऱ्यावर दही लावल्याने केवळ डागच कमी होत नाहीत, तर ते आपल्या त्वचेला खोलवर स्वच्छ आणि ओलावा देखील देते. (Winter Skin Care)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community