Winter Super Fruits : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळे

हिवाळ्यात हंगामी फळांचा समावेश करून, वजन कमी करण्याबरोबरच उर्जेची पातळी देखील राखली जाऊ शकते.

383
Winter Super Fruits : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा 'ही' फळे
Winter Super Fruits : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा 'ही' फळे

सर्दी, खोकला आणि ताप हे हिवाळ्यातील सामान्य आजार आहेत. अशा परिस्थितीत वजन कमी करणे खूप कठीण आहे. म्हणून तुमच्या आहारात काही बदल करून आणि हंगामी फळांचा समावेश करून, वजन कमी करण्याबरोबरच उर्जेची पातळी देखील राखली जाऊ शकते. (Winter Super Fruits)

(हेही वाचा – Dahisar River : रिव्हर व्हॅली आणि केसकर रस्त्याला जोडणाऱ्या दहिसर नदीवर बांधले जाणार पूल)

१. संत्रे

व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत संत्रे (Oranges) आहे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप चांगले फळ आहे. संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात आणि कॅलरी कमी असतात. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हे फळ पचन सुधारण्यास मदत करते आणि तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जावान ठेवते.

२. डाळिंब

डाळिंब (Pomegranate) हे उच्च अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि फायबर असलेले फळ आहे. त्यात खूप कमी कॅलरीज असतात. डाळिंब हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. व्यायामापूर्वी तुम्ही ते नाश्त्यात खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्स (एक प्रकारची चरबी) कमी होते.

३. सफरचंद

सफरचंद (apple) हे एक फळ आहे, जे जवळजवळ सर्व रोगांमध्ये खाता येते. या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसात वजन कमी करायचे असेल, तर सफरचंद हा नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. हे सलाड म्हणूनही खाऊ शकतो.

(हेही वाचा – Marathi Sahitya Sammelan : अमळनेर साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण)

४. किवी

किवी (Kiwi) हे जगातील सर्वांत पौष्टिक फळांपैकी एक आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि उच्च फायबर असते. किवी स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या फळाचा दैनंदिन जीवनात समावेश करू शकता.

५. पेरू

पेरूमध्ये (Guava) प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. जास्त खाणे हे शरीराचे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. पेरू हे एक फळ आहे. जे जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत करते. त्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.