युरोपमधील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेल्या यांडेक्स नावाच्या कंपनीने टेलिग्राम (Telegram) चॅनल्सवर जाहिराती दाखवण्यासाठी एका नव्या टूलचे टेस्टिंग करायला सुरुवात केली आहे. यांडेक्स ही कंपनी जाहिरात नेटवर्किंगचा वापर करणारे तीन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त जाहिरातदार आणि साढेचार लाख दैनिक जाहिरातींचे डिस्प्ले त्या जाहिरातींच्या टक्केवारी किंवा रँकनुसार जगभरातील पन्नास देशांमध्ये जाहिराती विषयी विस्तृत माहिती देते. या आपल्या प्रचंड आणि विस्तृत अनुभवाच्या जोरावर यांडेक्सने हल्ली वापरण्यात येणारे लोकप्रिय मेसेंजर टेलिग्रामसोबत आपल्या जाहिरातींच्या प्लॅटफॉर्मला जोडले आहे. जेणेकरून चॅनल्सच्या मालकांना आपल्या कंटेंट्सना मोनेटाइज करण्याची संधी मिळते.
(हेही वाचा – बालकांचे लसीकरण नोंदणीसाठी ‘या’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन)
अन्य मेसेंजिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेने टेलिग्राम (Telegram) हे बाहेरील कंपन्यांसाठी खुले आहे. यामुळे युजर्ससाठी नवनवे कंटेंट्स तयार करण्यासाठी गुंतवणूक करून जास्त कमाई करण्याचे साधन झाले आहे. यांडेक्सचे न्यूरल नेटवर्क्स चॅनलच्या विषयांना लक्षात ठेवून युजर्सच्या गरजेनुसार जाहिराती दाखवतात. जाहिरातींच्या पोस्ट्सना एका बॉटच्या साहाय्याने पोस्ट केले जाते. या बॉटची निर्मिती यांडेक्सनेच केली आहे.
जाहिरात किती वेळा दाखवायची, केव्हा दाखवायची याचे संपूर्ण नियंत्रण चॅनल्सच्या (Telegram) मालकाकडे असेल. येथे नवीन सुरू होणारे चॅनल्सही जाहिरात करून रेव्हेन्यू कमवू शकतात.
यांडेक्स ही एक अशी टेक्नॉलॉजी कंपनी आहे जी, मशीन लर्निंगद्वारे डिमांड असलेली कुशल उत्पादने आणि सेवा निर्मिती करते. यांडेक्स कंपनीचे लक्ष्य चॅनल्सच्या युजर्सना आणि व्यवसायिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने संचलन करता यावे हे आहे. यांडेक्स या कंपनीने 1997 पासून डिमांड असलेल्या उत्पादनांना वैश्विक स्तरावर तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community