तीळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तिळाचे सेवन हिवाळ्यात केले जाते, कारण ते उष्ण असतात. (Sesame Seeds) हिवाळ्यात लोक लाडू, हलवा इत्यादी पदार्थ करून तीळ खातात. यात ‘अ’ जीवनसत्व, ‘क’ जीवनसत्व, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. महिलांनी जाणकारांच्या सल्ल्याने याचा वापर नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे अनेक समस्यांवर तोडगा निघतो. त्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
(हेही वाचा – Fifteenth Finance Commission Fund मंजूर; मुंबईतील ८९ मोकळ्या जागांची हिरवळींसह करणार सुधारणा)
- तीळामध्ये पोटॅशियम (Potassium) मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तणाव आणि थकवा देखील दूर होतो.
- तिळाचे सेवन अनियमित मासिक पाळीची (Menstrual cycle) समस्या दूर करते. अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्येचा सामना करावा लागतो, ज्याचे एक मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली. तिळामध्ये फॅटी ऍसिडस् असतात, जे तुमची मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतात.
- तीळ व्हिटॅमिन सीने (Vitamin C) समृद्ध असतात, ज्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढते. तिळामध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म देखील असतात. त्यामुळे संप्रेरकांच्या असंतुलनाची समस्या सुटू शकते.
- तीळाचे तेल (Sesame oil) त्वचेसाठी खूप चांगले आहे. हे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
- महिला दिवसभर काही कामे करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरात उर्जेची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत दररोज तीळ खाल्ल्याने शरीरात ऊर्जा रहाते. तिळामध्ये ओमेगा-3 (Omega-3) फॅटी अॅसिड असते. त्यामुळे महिलांनी याचा वापर केला पाहिजे. (Sesame Seeds)
हेही पहा –