वर्ल्ड बेस्ट आणि २० वर्ष जुने ‘नोमा रेस्टॉरंट’ बंद होणार? जेवणासाठी वर्षभर आधी करावे लागायचे बुकिंग

जगातील सर्वात लोकप्रिय आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे ‘नोमा रेस्टॉरंट’ २०२४ मध्ये बंद होणार आहे. डेन्मार्कमधील नोमा रेस्टॉरंटची स्थापना ही २००३ मध्ये झाली होती. त्यानंतर अनेक वेळा या रेस्टॉरंटचा जागतिक पातळीवर सन्मान करण्यात आला. हे रेस्टॉरंट वातावरणानुसार उघडे आणि बंद होते. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जेवायला जायचे असेल, तर वर्षभर आधीच बुकिंग करावी लागते. या रेस्टॉरंटमधील सीट वर्षभर आधीच बुक केल्या जातात.

( हेही वाचा : ५० हजारात थायलंड-बॅंकॉक फिरण्याची सुवर्णसंधी! IRCTC कडून विशेष टूरचे आयोजन )

लवकरच नोमा ३.० ची सुरूवात

नोमा रेस्टॉरंट हे कायमस्वरूपी बंद होणार नसून डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये हे रेस्टॉरंट नव्या रुपात सुरू होणार आहे. नोमा रेस्टॉरंटचे सह-मालक आणि लोकप्रिय शेफ रेने रेडझेपी यांनी ही माहिती जगभरातील खवय्यांना दिली आहे. लवकरच नोमा ३.० ची सुरूवात नव्या शहरात करण्यात येणार आहे.

नोमा रेस्टॉरंट दोन दशकांपासून नॉर्डिक फूड सर्व्ह करत आहे. या रेस्टॉरंटमध्ये सध्या २०२४ च्या हिवाळ्यापर्यंत बुकिंग फुल्ल आहे. या रेस्टॉरंटचे नाव दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी यामध्ये काही बदल हे आवश्यक आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेडझेपी यांनी सांगितले आहे.

यापूर्वी २०१६ मध्ये नोमा रेस्टॉरंट री-ब्रडिंगसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर हे रेस्टॉरंट दोन वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नोमा नव्या रुपात समोर येणार आहे. नोमा ३.० चे स्वरूप कसे असेल याबाबत सर्व खवय्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here