प्रत्येक सहापैकी एका भारतीयाला मधुमेह

३० ते ४५ वयोगटतील माणसांमध्ये पूर्व मधुमेह दिसून येतोय.

124

वाढत्या  ताणतणावामुळे शरीरातील साखरेची मात्रा असंतुलित होत असल्याने भारत आता मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जात आहे. भारतातील प्रत्येक सहापैकी एकाला मधुमेह असल्याचे सर्वेक्षण मधुमेहतज्ज्ञ मांडतात. ७७ दशलक्ष भारतीय मधुमेहाने ग्रस्त असल्याचा दावाही काही सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे.

कोविडच्या काळात सर्वात जास्त मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. उपचारादरम्यान मधुमेह जास्त वाढल्याने रुग्ण उपचारांना फारसा प्रतिसाद देत नव्हते. परिणामी कित्येक रुग्णांना वाचवण्यात अपयश आले. कधी काळी मधुमेह केवळ वृद्धांमध्ये आढळत होता. आता तरुणांमधील वाढती मधुमेहाची संख्या लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रात ‘यंग डायबिटीलोजी’ ही संकल्पना आकार घेत असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा फेसबुक उघडलं तर बसेल कानाखाली! )

 काय सांगतेय मधुमेहाबाबतचे सर्वेक्षण?

  •  ३० ते ४५ वयोगटतील माणसांमध्ये पूर्व मधुमेह दिसून येतोय.
  • पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मधुमेहाची सर्वात जास्त भीती.
  • जगभरात मधुमेहाचा आजार झपाट्याने पसरतोय. जगभरात वयस्क मधुमेहींची संख्या ५,३७० लाख असून २०३० सालापर्यंत ६,४३० लाखांवर पोहोचेल.
  • भारतात २०४५ पर्यंत मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या १,३४० पर्यंत पोहोचेल.

भारत मधुमेहाची राजधानी म्हणून का ओळखला जातोय?

लॉंगीट्युडनल एजिंग स्टडी ऑफ इंडियामध्ये दिलेल्या माहितीनुसार ४५ पेक्षा जास्त वयोमानातील ११.५ टक्के भारतीयांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अतिरिक्त दिसतेय. म्हणून भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी असे संबोधले जातेय.

(हेही वाचा फेसबुक उघडलं तर बसेल कानाखाली! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.