World Donar Day : रक्तदान करण्याचे आरोग्यदायी फायदे

रक्तगटांचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लॅंडस्टीनर यांचा जन्म १४ जून १८६८ रोजी झाला. रक्तदात्याला रक्तदान करण्यास व नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून १४ जून हा हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत, याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : बेस्ट कामगारांची भोजन व्यवस्था पूर्वीप्रमाणे करा; अन्यथा भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)

रक्तदानाचे फायदे

 • रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका ३० ते ४० टक्क्यांनी कमी होतो.
 • नियमित रक्तदानामुळे कर्करोग आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.
 • रक्तदान केल्याने वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते. कारण रक्तदान केल्यावर तब्बल ६५० कॅलरीज कमी होतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो.
 • रक्तदान करण्यापूर्वी आपले रक्त तपासले जाते. त्यामुळे आपल्या हिपेटायटीस बी, HIV ,हिपेटायटीस सी, सिपलिस या आजरांच्या रक्तचाचण्याही केल्या जातात. यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत.

रक्तदान कोण करू शकते? 

 • १८ ते ६५ वर्षे वयोगटातील सर्व निरोगी लोक रक्तदान करू शकतात.
 • रक्तदान करण्यापूर्वी १५ दिवस कॉलरा, टायफाइड, टिटॅनस इत्याही लस घेतलेल्या नसाव्यात.
 • रेबीजची लस घेतल्यानंतर तुम्ही एक वर्षाने रक्तदान करू शकता.
 • रक्तदान करण्यापूर्वी तीन महिन्यांपर्यंत मलेरियावर उपचार केले गेले नसावेत.
 • रक्तदान करण्यापूर्वी सहा महिने आधी कोणताही टॅटू काढलेला नसावा.
 • १२ महिन्यांमध्ये कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी.
 • हृदयरोग, कर्करोग, हिपेटायटीस बी, हिपेटायटीस सी, HIV, टीबी, कुष्ठरोगासारखे आजार नसावेत.
 • रक्तदान करायचे असल्यास अमली पदार्थांचे सेवन करू नये.
 • इन्सुलिन घेणारे रूग्ण रक्तदान करू शकत नाहीत.
 • अल्सर, दमा, थॅलेसीमिया, रक्तस्त्राव अशा समस्या असू नयेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here