जागतिक अन्न दिवस दरवर्षी १६ ऑक्टोबरला साजरा केला जातो. पौष्टिक आहार, त्यापासून होणारे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टरही कायम आपल्याला संतुलित, हेल्दी आहार करण्याचा सल्ला देतात. परंतु काही जण सकाळी उठल्यावर हेल्दी खाणं टाळतात अशावेळी तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मिसळ पाव, समोसा, वडापाव हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा…
( हेही वाचा : बोरिवली ते ठाणे फक्त २० मिनिटांत प्रवास; तयार होणार भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग )
सकाळी नाश्ता करताना हे पदार्थ खाताय? तर सावधान!
अनेकदा मुंबईसारख्या शहरांमध्ये नाश्त्याला सर्रास पाव खाल्ला जातो. पावाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होता. तसेच सकाळच्यावेळी मिसळ पाव असे तिखट पदार्थ खाणेही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे शक्यतो पाव खाणं टाळा.
समोसा, वडापावसारखे पदार्थ नाश्त्याला खाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण बटाटा, बेसन या पदार्थांमुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. सकाळच्यावेळी शक्यतो बटाट्याचे सेवन करू नका.
मुंबईत बरेचजण सकाळी साऊथ इंडियन नाश्ता करतात परंतु मेदूवडा आंबवलेल्या पीठापासून बनवतात त्यामुळे तो पचायला जड जातो. आंबवलेल्या पदार्थांमध्ये यीस्ट नावाचा पदार्थ घालतात. जो शरीरासाठी घातक असतो आणि यामुळे त्वचेवर अॅलर्जी किंला पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. म्हणून नाश्त्याला आंबवलेले पदार्थ खाऊ नका.
cereal food, ओट्स, Chocos अशाप्रकारचा पॅकबंद नाश्ता करणे सुद्धा शरीरासाठी फायदेशीर नसते त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
पूर्वीच्या काळी चहा, चपाती, भाकरी, पोहे, उपमा हे पदार्थ खाण्याची परंपरा होती परंतु गेल्या वर्षांमध्ये आपली जीवनशैली बदलली आहे. लोकांच्या कल अलिकडे Street Food खाण्याकडे अधिक असतो. सकाळची सुरूवात ही कायम पौष्टिक आहाराने केली हवी. यामुळे तुमचे शरीर संतुलित राहण्यास मदत होते. पराठे, रवा, अंडी, सुकामेवा, चपाती, पोहे, खजूर हे पौष्टिक पदार्थ नाश्त्यासाठी सर्वात उत्तम ठरतील.
Join Our WhatsApp Community