दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन (world pulses day) साजरा केला जातो. जागतिक स्तरावर कडधान्यांचे महत्त्व आणि त्याद्वारे मिळणारे पोषक घटक लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. (world pulses day)
(हेही वाचा – Droupadi Murmu यांनी प्रयागराज येथे केले संगमस्नान; कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती)
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २० डिसेंबर २०१३ रोजी २०१६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष’ म्हणून घोषित करणारा ठराव मंजूर केला. २०१९ मध्ये, महासभेने १० फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून, कडधान्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. कडधान्यांचा वापर केवळ पोषण मिळविण्यासाठी केला जात नाही तर ते भूक आणि गरिबी दूर करण्यास देखील मदत करते. जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या साथीपासून वाचण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा सर्वात मोठे देश देखील अन्न संकटाशी झुंजताना दिसत होते. अन्न संकट संपवण्यासाठी आणि भविष्यात ही परिस्थिती टाळण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (world pulses day)
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : दिव्याखाली अंधार म्हण सार्थ ठरवणारे पुरोगामी)
संयुक्त राष्ट्र संघाला डाळींचे व कडध्यांचे उत्पादन वाढवून जगातील गरीब आणि कुपोषित देशांना पौष्टिक अन्न पुरवायचे आहे. कारण डाळींमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात. खरं पाहता भारतात डाळीं व कडधान्यांचे आधीपासूनच महत्त्व आहे. भारतात असे एकही घर नसेल जिथे डाळी व कडधान्यांचा वापर होत नसेल. आज जगाला याचे महत्त्व कळलेले आहे. पण भारताने याचे अनुकरण केव्हाच केलेले आहे. मुळात ती भारतीय संस्कृतीच आहे. जागतिक कडधान्य दिनाचा मुख्य उद्देश डाळींचे व कडधान्यांचे उत्पादन आणि वापर याबाबत जागरुकता वाढवणे, जेणेकरून जागतिक स्तरावर कुपोषण आणि उपासमार कमी करता येईल. याव्यतिरिक्त, हा दिवस शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डाळींच्या पर्यावरणीय फायद्यांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी म्हणून साजरा केला करतो. (world pulses day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community