जागतिक पर्यटन दिन : पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

129

गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

( हेही वाचा : महापालिकेत आता पूर्ण क्षमतेने आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरी; आणखी २५ ठिकाणी बसवणार प्रणाली)

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान संपन्न झाले यावेळी पर्यटन मंत्री लोढा बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील देशात स्वच्छता अभियानास मोठ्या प्रमाणात गती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पर्यटनाला गती मिळावी तसेच पर्यटन स्थळे अधिक सुंदर व्हावी यावर आपण अधिक भर देणार आहोत. यात तुमचा सर्वांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे असेही पर्यटन मंत्र्यांनी सांगितले.

स्वच्छ शहर म्हणून मुंबईला पारितोषिक मिळावे यासाठी आपण प्रयत्न करूया – अमृता फडणवीस

अमृता फडणवीस म्हणाल्या, जिथे स्वच्छता नांदते तिथे शक्ती असते. आपला भारत, महाराष्ट्र व मुंबई हे स्वच्छ असावे यासाठी असे स्वच्छतेचे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत इंदौर या शहराने स्वच्छ शहर म्हणून आपला लौकीक राखला आहे. आगामी स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मुंबई शहर हे असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छतेचा आग्रह धरून देशात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले आहे. आपण देखील उपक्रमांमधून स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न करूया असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.