जागतिक वडापाव दिन : मुंबईची ओळख ते दुबईत २ हजाराला मिळणारा सोन्याचा वडापाव; ‘जगात भारी’ वडापावची गोष्ट

159

मुंबईतील प्रत्येक माणसाच्या तोंडी ऐकलेलं वाक्य म्हणजे मी वडापाव खाऊन दिवस काढलेत. २३ ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईकर अगदी सकाळच्या नाश्तापासून ते मध्यरात्री ३ वाजता सुद्धा वडापाव आवडीने खातात. अशोक वैद्य यांनी दादर स्टेशन बाहेर १९६६ मध्ये एक स्टॉल सुरू केला. या स्टॉलमध्ये ते आधी पोहे, वडा आणि ऑम्लेट पाव विकायचे त्यानंतर त्यांनी एक दिवस नवा प्रयोग करू पाहिला आणि बटाटावडा पावात टाकून चटणी लावून विकला पाहता पाहता वडापाव इतका लोकप्रिय झाला की, आजच्या काळात जागोजागी, गल्लोगल्ली हा वडापाव विकला जातो. चीझ वडापाव, शेजवान वडापाव, मेयॉनिझ वडापाव म्हणजेच साध्या वडापावपासून ते सोन्याचा वडापाव आज बाजारात विकला जातोय एवढी प्रचंड क्रेझ या वडापावची जगभरात निर्माण झाली आहे.

( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा!)

साधा वडापाव ते सोन्याचा वडापाव

मुंबईच्या वडापावची दुबईवासीयांनी सुद्धा दखल घेतली. दुबईमध्ये तब्बल १०० दिनार म्हणजेच २ हजार रुपयात सोन्याचा वडापाव विकला जातो. ट्रफल बटर आणि चीजसह या वडापावला खऱ्या २२ कॅरेट सोन्याचा मुलामा लावला जातो. हा सोन्याचा वडापाव सोशल मिडीयावर सुद्धा तेवढाच लोकप्रिय आहे. गिरणी कामगारांच्या संप काळात अनेकांचे रोजगार गेले तेव्हा अनेक गिरणी कामगारांनी वडापाव गाड्या सुरू केल्या. पूर्वी ५ ते १० रुपयात मिळणार हा वडापाव आता १५ ते २० रुपयात विकला जातो. वडापावचे स्वरूप नक्कीच बदलले परंतु मुंबई आणि वडापाव हे समीकरण केव्हाच बदलू शकणार नाही म्हणूनच परदेशी सुद्धा भारतीय पदार्थांमध्ये वडापावचा उल्लेख आवर्जून करतात.

New Project 7 10

आपण पाहूयात मुंबईतील फेमस वडापाव स्पॉट येथीस गरमागरम वडापावचा आस्वाद तुम्ही एकदा तरी घ्यायलाच हवा…

अशोक वडापाव

ठिकाण – किर्ती कॉलेज

दादरमधील किर्ती कॉलेज जवळ अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या वडापावचा आस्वाद घेतला आहे. अशोक वडापाव येथे मिळणारा चुरा पाव देखील खाद्यप्रेमींची फेव्हरेट आहे.

New Project 3 6

सम्राट वडापाव (पार्लेश्वर)

  • ठिकाण – विलेपार्ले पूर्व
  • किंमत – २० रुपयांपासून सुरू

विलेपार्ले स्थानकांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सम्राट वडापावमध्ये तुम्ही पारंपरिक वडापाव व्यतिरिक्त विविध प्रकारचे वडापाव उदाहरणार्थ चीझ वडापाव, शेजवान वडापाव, मसाला पाव असे पदार्थ ट्राय करू शकता.

भाऊ वडापाव

  • ठिकाण -भांडुप पश्चिम
  • किंमत – २० रुपये

भांडुपमधील सर्वात फेमस वडापाव सेंटर म्हणजे भाऊ वडापाव. इतर वडापावपेक्षा हा आकाराने किंचित मोठा असल्याने एक वडापाव खाल्ला तरी तुमचे पोट भरू शकते तसेच या वडापावसोबत चुरा सुद्धा दिला जातो.

आराम वडापाव

  • ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
  • किंमत – २० रुपये

ऑगस्ट १९३९ मध्ये तांबे कुटुंबीयांनी आराम वडापाव सुरू केला. आराम वडापाव सेंटरमध्ये सुरूवातीच्या काळात फक्त ५ रुपयात वडापाव मिळत होता. आता या वडापावची किंमत २० रुपये आहे. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनससमोरच सिग्नल ओलांडला की, तुम्हाला आराम वडापाव सेंटर दिसेल.

गजानन वडापाव

  • ठिकाण – ठाणे पश्चिम
  • किंमत – १५ रुपये

चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजेच ठाण्यातील गजानन वडापाव. ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस हा वडापाव मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते. तसेच या वडापावसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा सर्व्ह केला जातो.

New Project 6 6

मसाला वडापाव

  • ठिकाण – मुलुंड
  • किंमत – २५ रुपये

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाजवळ एका छोट्या स्टॉलवर मसाला वडापाव ही हटके रेसिपी गेली कित्येक वर्ष विकली जात आहे.

New Project 7 4

ग्रॅच्युएट वडापाव

ठिकाण – भायखळा

भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅच्युएट वडापाव मिळतो. हा मुंबईतीस प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेले १७ वर्ष लोक येथील वडापावचा आस्वाद घेतला जात आहे.

आनंद वडापाव

  • ठिकाण- मिठीबाई कॉलेज समोर
  • किंमत – २५ रुपयांपासून सुरू

मुंबईतील बेस्ट वडापावचा किताब सर्वाधिक वेळा मिळवलेले ठिकाण म्हणजे मिठीबाई कॉलेजसमोर असलेला आनंद स्टॉल येतील वडापाव. पावाला बटर आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चटणी लावून हा वडापाव सर्व्ह केला जातो. याशिवाय येथे मेयॉनिज, चीझ वडापाव, ग्रील वडापाव देखील तुम्ही ट्राय करू शकता.

New Project 4 6

बोरकर वडापाव

ठिकाण – गिरगाव

गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईतील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते. तुम्ही गिरगाव चौपाटीवर देखील या वडापावचा आस्वाद घेऊ शकता.

New Project 5 7

कुंजविहार वडापाव

ठिकाण – ठाणे पश्चिम

ठाणे (पश्चिम) रेल्वे स्थानकापासून अगही हाकेच्या अंतरावर मिळणारा हा कुंजविहार वडापाव खाद्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.